सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:37 IST

ऑक्टोबरअखेरही उकाडा कायम, मुंबई आणि कोकणातील चार जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

पाऊस गायब झाला असून राज्यभर उन्हाचा चटका जाणवत आहे. उत्तर कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट आहे, तर बंगालच्या उपसागरात सोमवारी चक्रीवादळाचे संकेत आहेत.

ऑक्टोबरअखेरही उकाडा कायम, मुंबई आणि कोकणातील चार जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ऑक्टोबर महिना संपायला आला आहे, तरीही संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा कडक चटका आणि तीव्र उकाडा सतत जाणवत आहे. आज, 24 ऑक्टोबरला उत्तर कोकणात तीव्र उष्ण आणि दमट हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. म्हणून या भागासाठी सतर्कतेचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

पाऊस जवळपास सगळीकडून गायब झाला असला, तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही भागांत हवामान कोरडे राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात.

आता विभागवार पाहूया. कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांत आज उष्ण आणि अत्यंत दमट हवामान राहणार असल्याने तिथे यलो अलर्ट आहे. त्याउलट रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाने सगळीकडेच विश्रांती घेतली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत आज हवामान पूर्णपणे कोरडे राहील, असा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची वेगवेगळी रूपे दिसत आहेत. पुणे, पुणे घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मात्र मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. शिवाय सातारा आणि सांगली जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांसह हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांत आज हवामान पूर्णपणे कोरडे राहील.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हवामान सामान्य राहील. हवामान विभागाने या संपूर्ण भागासाठी कोणताही इशारा किंवा अलर्ट दिलेला नाही.

दरम्यान, देशाच्या सागरी क्षेत्रात नव्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. ही प्रणाली आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकत असताना अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारी उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

तसेच दक्षिण केरळ आणि त्याला लागून असलेल्या अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीमुळे समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ