सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 10:20 IST

सोनिया गांधींची 'X' वर पहिलीच पोस्ट, राजीव गांधींसोबतच्या भेटीची आठवण आणि नव्या पुस्तकाची घोषणा

काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 'X' वर पहिली पोस्ट करत 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकाची घोषणा केली. पुस्तक 10 नोव्हेंबर रोजी येणार आहे.

सोनिया गांधींची 'X' वर पहिलीच पोस्ट, राजीव गांधींसोबतच्या भेटीची आठवण आणि नव्या पुस्तकाची घोषणा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

काँग्रेस संसदीय दलाच्या (CPP) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या नव्या पुस्तकाची घोषणा केली. पुस्तकाचे नाव 'Belonging: A Journey of Love' असे असून ते 10 नोव्हेंबर रोजी वाचकांच्या हाती येणार आहे.

पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आणि त्यांच्या प्रेमकहाणीच्या सुरुवातीची आठवण सांगितली. आज 24 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांनी ही पोस्ट केली. त्या फेब्रुवारी 2013 मध्ये 'X' वर आल्या होत्या, पण आतापर्यंत त्यांनी तिथे एकही पोस्ट केली नव्हती.

पोस्टमध्ये सोनिया गांधींनी लिहिले, "कॅम्ब्रिजच्या एका छोट्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये माझ्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला." पुढे त्या म्हणतात, "राजीव आणि मी मिळून प्रेम, हास्य आणि आठवणींनी भरलेले एक सुंदर जग तयार केले. आगामी 10 नोव्हेंबर रोजी मी तेच जग तुमच्यासोबत शेअर करणार आहे."

व्हिडिओच्या सुरुवातीला सोनिया गांधी पुस्तकाची पाने उलटताना दिसतात. पुस्तकातला राजीव गांधींचा फोटो बघत त्या त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाची आठवण काढतात. त्यानंतर पहिली भेट कशी झाली आणि पुढे हा प्रवास कसा सरकत गेला, हे त्यांनी सविस्तर सांगितले.

सोनिया गांधींनी सांगितल्याप्रमाणे, इंग्लंडमधील कॅम्ब्रिज येथे एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची राजीव गांधींशी भेट झाली. आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत, अशी जाणीव दोघांनाही झाली होती. पण सुरुवातीला त्यांची मैत्री झाली. ते एकत्र पार्टीला जायचे आणि फिरायलाही निघायचे. एकदा तर ते दोघे व्हॅलेंटाईन पार्टीलाही गेले होते. नंतर त्यांचे नाते प्रेमात बदलले.

राजीव गांधींबद्दल बोलताना त्या म्हणतात की, ते दिसायला अतिशय देखणे होते, पण त्यांच्या स्वभावात वेगळीच शालीनता आणि सज्जनताही होती. याच स्वभावाने त्यांना भुरळ घातली. व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, "ते अतिशय देखणे होते, परंतु त्यांच्यामध्ये विलक्षण शालीनता होती. त्यांची हीच गोष्ट माझ्या मनाला भावली आणि कायमची कोरली गेली. मी माझी ती पहिली भेट कधीच विसरू शकत नाही."

त्यांनी उल्लेख केलेल्या जागेचे नाव 'Varsity Restaurant' आहे. कॅम्ब्रिजमधल्या या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये युरोपीय आणि भारतीय विद्यार्थी जेवायला यायचे. सोनिया गांधींच्या सांगण्यानुसार, तिथे त्यांना आवडीचे इटालियन जेवण मिळायचे. याच रेस्टॉरंटमध्ये राजीव गांधींशी भेट झाली आणि नात्याची सुरुवात झाली. दोघे कॅम्ब्रिजमध्ये शिकत असतानाच एकमेकांच्या जवळ आले, त्या काळातील सुंदर आठवणी या बोलण्यात दडलेल्या आहेत.

पोस्टमध्ये त्यांनी राजीव गांधींसोबत घालवलेले आयुष्य म्हणजे प्रेम, हास्य आणि आठवणींचे विश्व असल्याचे म्हटले आहे. या पुस्तकातून त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आणि राजीव गांधींसोबतच्या नात्यातल्या अनेक महत्त्वाच्या आठवणी वाचकांसोबत शेअर करणार आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ