दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
14:30  मांजरसुंबा घाटात प्रोपिलीन टँकरला अपघात; वायूगळतीचा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी घेतले तज्ज्ञांचे मार्गदर्शन 11:50  आष्टीत वाघाच्या हल्ल्यात देवळालीचे शेतकरी देविदास टकले ठार 19:27  मुख्यमंत्री फडणवीस यांचा लोहारी सावंगात शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम 19:10  दिवाळीच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; उमरेडजवळ 2.6 तीव्रतेची नोंद 17:42  वर्ध्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा, १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत ५ हजार रुपये जमा 17:38  गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांत १११ कोटींहून अधिक रक्कम जमा, अग्रीम, पीएम किसान आणि कर्जमुक्तीचा
सर्व थेट अपडेट

पवारांना मोदींचा फोन, पटेलांची भेट आणि पार्थ पवार दोन दिवस सिल्व्हर ओकवर

राजकारण PT24 टीम

रुग्णालयातून घरी परतलेल्या शरद पवारांना पंतप्रधानांचा फोन आला, प्रफुल्ल पटेल भेटले आणि पार्थ पवार दोन दिवस घरी गेले. यावरून राजकीय वर्तुळात विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे पवारांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते मुंबईतील आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी परतले. रुग्णालयात असल्यापासून ते घरी येईपर्यंतच्या काळात जे काही घडले, त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

पवार रुग्णालयात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना थेट फोन करून तब्येतीची विचारपूस केली. मोदींनी पवारांना सांगितले, "तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि विश्रांती घ्या, मी आणि सुप्रिया देश सांभाळू." त्यावर पवारांनी उत्तर दिले, "होय, मी विश्रांती घेतोय, तुम्ही सगळे असल्यानंतर मला देशाची चिंता नाही."

हा संवाद पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी माध्यमांसमोर सांगितला. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात या फोनचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातही हालचाली वाढल्या. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि तेथून ते थेट ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांना भेटायला गेले. या भेटीतील दोघांच्या बोलण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

त्या व्हिडिओमध्ये शरद पवार प्रफुल्ल पटेलांना "आपण 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू" असे सांगताना दिसतात. ही तारीख 10 नोव्हेंबरची मानली जात आहे. या वाक्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत किंवा त्यांच्या विलीनीकरणाबाबत पडद्यामागे काही चर्चा सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पवारांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी लागोपाठ दोन दिवस सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट नव्हती, तर दोन्ही गटांची पुढील वाटचाल, राजकीय समीकरणे आणि विलीनीकरणाचा विषय यावर सखोल चर्चा झाली, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दोन गटांतील अंतर मिटवण्यासाठी ही बोलणी सुरू असल्याची चर्चाही आहे.

या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इतर नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. राजेंद्र पवार म्हणाले की, विलीनीकरणाबाबत पक्षाचे प्रमुख जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल, आणि याबद्दल आपल्याला अधिकृतपणे काहीही माहिती नाही.

मोदींचा फोन, पटेलांची भेट आणि पार्थ पवारांच्या सलग दोन दिवसांच्या भेटी या एकाच साखळीचा भाग असल्यासारख्या दिसतात, असे चित्र चर्चेत आहे. 10 नोव्हेंबरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ