गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
06:48 IST

गाजर आहारात घेतल्यास डोळे, पचन आणि रोगप्रतिकारशक्तीला फायदा होतो, असे सांगितले जाते

थंडीत बाजारात येणाऱ्या गाजरचे फायदे आणि ते कच्चे की हलके शिजवून खावे, याबद्दलची सामान्य माहिती.

गाजर आहारात घेतल्यास डोळे, पचन आणि रोगप्रतिकारशक्तीला फायदा होतो, असे सांगितले जाते छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

थंडीच्या दिवसांत बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात येतात. चवीला गोड असलेले गाजर शरीरासाठी फायदेशीर मानले जाते, त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ते खावे, असे सांगितले जाते. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन, विटामिन असे अनेक घटक भरपूर प्रमाणात असतात.

बहुतेक भाज्या शिजवल्या किंवा उकडल्या की त्यातले पोषक घटक कमी होतात. गाजरमध्ये मात्र कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. कच्च्या गाजरमध्ये विटामिन सी आणि फायबर असते. कच्चे आणि हलके शिजवलेले गाजर आहारात घेणे फायदेशीर ठरते, तर गाजर पूर्ण मॅश करून खाऊ नये, असेही सांगितले आहे.

वय वाढते तसतशी डोळ्यांची नजर हळूहळू कमी होते आणि ती परत मिळवण्यासाठी चष्मा लावला जातो. आहारात गाजर घेतल्यास डोळ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारेल, असे सांगितले जाते. गाजरमधील बीटा-कॅरोटीनचे रूपांतर विटामिन 'ए' मध्ये होते आणि त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. गाजर हलके वाफवले किंवा उकडले, तर त्यातल्या कठीण पेशी मऊ होतात आणि शरीराला बीटा-कॅरोटीन शोषून घेणे सोपे जाते. म्हणून जेवताना सॅलडमध्ये गाजर असावे, असे म्हटले आहे.

आहारात सारखे बदल होत राहिले की त्याचा परिणाम तब्येतीवर लगेच दिसतो, त्यामुळे सहज पचणारे पदार्थ खाणे गरजेचे आहे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा गाजर खाल्ले तर पचन सुधारण्यास मदत होते. गाजरमध्ये अविद्राव्य फायबर आणि नैसर्गिक एन्झाइम्स भरपूर असतात, त्यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत राहते. दुपारच्या जेवणात काकडी, गाजर, बीट, टोमॅटो घ्यावेत, असे सुचवले आहे.

वातावरणात सतत बदल होत राहिले की रोगप्रतिकारशक्ती कमी होते. वारंवार ताप, सर्दी, खोकला आला की अशक्तपणा आणि थकवा वाढतो. तो कमी करण्यासाठी गाजराचे सूप किंवा सॅलड आहारात घ्यावे. गाजरमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवणारे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून सुटका मिळवण्यासाठीही गाजर आहारात असावे, असे म्हटले आहे.

कच्च्या गाजरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. म्हणून गाजर हलके शिजवून किंवा उकडून खावे, असे सांगितले आहे. कच्च्या गाजरमधील अविद्राव्य फायबर पचनाला मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते. फायबर, बीटा-कॅरोटीन आणि पोटॅशियम या पोषक तत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून कोणत्याही उपचाराचा दावा त्यात नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ