सारा तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या व्हिडिओवरून अर्जुन-सानियाच्या जुळ्यांची चर्चा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सारा तेंडुलकरने २९ व्या वाढदिवसाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आणि त्याखालच्या शुभेच्छांमुळे तिच्या लग्नाची तसेच अर्जुन-सानियाच्या घरी पाळणा हलण्याची चर्चा सुरू झाली आहे.
सारा तेंडुलकरने आपला २९ वा वाढदिवस घरच्या घरी कसा साजरा केला, याचा व्हिडिओ नुकताच तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला. साराचा वाढदिवस १२ ऑक्टोबरला असतो. पण हा व्हिडिओ आल्यानंतर इंटरनेटवर तिच्या लग्नाची आणि अर्जुन व सानिया लवकरच आई-बाबा होणार की काय, याचीच चर्चा रंगली आहे.
या चर्चेला कारण ठरल्या आहेत व्हिडिओतल्या शुभेच्छा. साराला अनेकांनी वेगवेगळ्या इच्छा सांगितल्या. त्यातली सर्वात मोठी इच्छा अशी होती की, 'लवकरच तू अर्जुन - सानियाच्या जुळ्या मुलांची आत्या व्हावंस'. हे ऐकताच नेटकऱ्यांचे कान टवकारले. अर्जुन - सानियाच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म होणार आणि सचिन तेंडुलकर जुळ्या नातवांचे आजोबा होणार, असा अंदाज आता लोक बांधत आहेत. या इच्छेमुळेच साराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.
साराची वहिनी सानिया ही तिची बेस्ट फ्रेंडही आहे. सानियाने साराने लवकरच लग्न करावं आणि आपल्या घराजवळच राहावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
व्हिडिओत सचिनही भावूक झालेला दिसतो. सारा आता २९ वर्षांची झाली आहे आणि ती लवकरच लग्न करून जाईल, या भावनेने तो हळवा झाला असावा, असं पाहणाऱ्यांना वाटतंय. त्यामुळे सारा लवकरच लग्न करणार का, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. व्हिडिओखाली खूप कमेंट्स आल्या आहेत आणि लाईक्सचाही वर्षाव होतोय.
वाढदिवस होऊन जवळपास एक महिना झाल्यावर साराने हा व्हिडिओ आताच का शेअर केला, असाही प्रश्न विचारला जातोय. अर्जुन - सानियाच्या आई-बाबा होण्याचं हे Soft Launching तर नाही ना, असंही काहींना वाटतं. मात्र तेंडुलकर कुटुंबीयांकडून अधिकृत प्रतिक्रिया येत नाही, तोपर्यंत काहीच स्पष्ट होणार नाही.
सारा मॉडेल म्हणून काम करते. त्याशिवाय ती अनेक पातळ्यांवर समाजसेवाही करते आणि पाळीव प्राणी व कुत्र्यांसाठीही काम करताना दिसते. गेली कित्येक वर्षं तिचं नाव भारतीय क्रिकेट स्टार शुभमन गिल याच्याशी जोडलं जातं. पण सारा किंवा शुभमन या दोघांनीही याबाबत कधी प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा मीडियासमोर मन मोकळं केलेलं नाही. शुभमनने एका कार्यक्रमात सारा आपली बेस्ट फ्रेंड असल्याचं मात्र म्हटलं होतं.
आता तेंडुलकर कुटुंबीय गुड न्यूज नक्की कधी देणार, याची चाहते मनापासून वाट पाहत आहेत. साराचं लग्न आणि अर्जुन - सानिया खरंच आई-बाबा होणार की नाही, या दोन्ही बाजूंनी उत्सुकता ताणली गेली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.