दिल्लीच्या रस्त्यावर धुराची गाडी पाहून ब्रिटिश व्लॉगर चक्रावला; म्हणाला, "भारत सर्वात वेडा देश"
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ब्रिटनहून भारतात आलेल्या मिचेल नावाच्या व्लॉगरने दिल्लीत डासांसाठी धूर फवारणारी गाडी पाहिली. त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर २३ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे.
दिल्ली शहरातल्या एका रस्त्यावरून फिरत असताना ब्रिटनहून आलेल्या मिचेल नावाच्या व्लॉगरला डासांना पळवून लावणारी एक गाडी दिसली. असा काही प्रकार असतो, हे त्याला माहीत नव्हते. रस्त्यावर धूर फवारला जात असल्याचे पाहिल्यावर काहीतरी आणीबाणीची परिस्थिती आली आहे, असे त्याला वाटले. त्याने हा सगळा प्रसंग व्हिडिओत टिपला. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे आणि त्यावर सगळीकडून प्रतिक्रिया येत आहेत.
भारतात नुकताच आलेल्या मिचेलने जवळच्या एका माणसाला विचारले की हे नेमके काय चालले आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका भारतीयाने त्याला सांगितले की डासांना पळवून लावण्यासाठी धुराची गाडी फिरवली जात आहे. हे ऐकून मिचेल पुरता चक्रावून गेला. तो म्हणतो, "मी आतापर्यंत भेट दिलेल्या सर्व देशांपैकी भारत हा सर्वात वेडा देश आहे."
याच वेळी रस्त्यावर एक गाय फिरताना त्याला दिसली. त्या गायीबद्दलही मिचेल चिंता व्यक्त करताना व्हिडिओत दिसतो. एकीकडे लोक रस्त्यावर चालत आहेत आणि त्याच वेळी तिथे धूर फवारला जात आहे, हे पाहून तो थक्क झाला. डास मारण्यासाठी धुराची गाडी फिरत होती आणि आजूबाजूला माणसे व गाय रस्त्यावर होती, हे दृश्य त्याच्यासाठी धक्कादायक ठरले.
या संदर्भात एक गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. रस्त्यांवर डासांचा धूर सोडण्यापूर्वी लोकांनी आपल्या घराच्या खिडक्या आणि दारे बंद केली पाहिजेत, कारण हा धूर हानिकारक आहे.
मिचेलने आतापर्यंत भारतासह एकूण १२ देशांना भेट दिली आहे. त्यात लाओस, कंबोडिया, थायलंड, पोर्तुगाल, अमेरिका, व्हिएतनाम, फिलीपिन्स, चीन, मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. इतके देश पाहिलेले असतानाही त्याच्यासाठी भारत हा आतापर्यंतचा सर्वात विलक्षण देश ठरला आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने असेही लिहिले आहे, "भारत अद्भुत आहे."
हा व्हिडिओ आतापर्यंत २३ लाखांहून अधिक इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी पाहिला आहे. दिल्लीच्या रस्त्यावरचे हे दृश्य एका परदेशी पाहुण्याच्या नजरेतून समोर आल्याने त्यावर अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.