सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन, १५ जागा बिनविरोध, सहा जागांसाठी लढत
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १५ उमेदवार बिनविरोध निवडले गेले, तर सहा जागांसाठी चुरस आहे आणि गोपीचंद पडळकरांसह दिग्गज नेते रिंगणात आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा धुरळा आता उडायला सुरू झाला आहे. आधी अनेक राजकीय आणि न्यायालयीन घडामोडी झाल्या. त्यानंतर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी भूमिका पुढे आली.
भाजप नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना विनंती केली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नातून १५ उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मात्र तासगाव, मिरज, कवठेमंकाळ आणि जत येथील सहा जागांवरचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या लढतीत विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार सुमन पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.
एरवी एकमेकांच्या विरोधात गळे काढणारे हे नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहेत. जिल्हा पातळीवरील एका शिल्लक बँकेसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना निवडणूक बिनविरोध करा, अशी विनंती करावी लागली.
आणि तरीसुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडणूक लढावी लागत आहे. त्यामुळे भाजपा श्रेष्ठी कमी पडले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.