बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:13 IST

न्यूझीलंड दौऱ्याआधी केएल राहुलचा खराब फॉर्म, रणजीत दोन्ही डावांत अपयश

न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सिरिजसाठी संघ लवकरच जाहीर होण्याची शक्यता असताना, रणजी ट्रॉफीत कर्नाटककडून खेळणाऱ्या केएल राहुलला दोन्ही डावांत मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

न्यूझीलंड दौऱ्याआधी केएल राहुलचा खराब फॉर्म, रणजीत दोन्ही डावांत अपयश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतीय क्रिकेट संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. ही टेस्ट सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही सिरिज अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या सिरिजसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुलचा खराब फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी सराव आणि फॉर्म मिळवण्यासाठी राहुल मैदानात उतरला होता, पण फलंदाजीत तो अपयशी ठरला. दोन्ही डावांमध्ये राहुल अपयशी ठरल्याचे दिसून आले.

रणजी ट्रॉफीत आंध्र आणि कर्नाटक यांच्यात एलिट ग्रुप 'ब' चा सामना खेळवला जात आहे. कर्नाटकचा संघ जेव्हा या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला उतरला, तेव्हा राहुलने डावाची सुरुवात केली. मात्र तो फक्त 4 रन्स करून आउट झाला.

पहिल्या डावातील अपयशानंतर दुसऱ्या डावातही राहुलची तीच कहाणी पाहायला मिळाली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला राहुल २० बॉल खेळून केवळ १ रन काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. म्हणजे पहिल्या डावात 4 रन्स आणि दुसऱ्या डावात १ रन, अशी त्याची कामगिरी राहिली.

केएल राहुल हा भारतीय कसोटी संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू समजला जातो. मिडल ऑर्डरमध्ये चांगली धावसंख्या उभी करून त्याने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्याआधी त्याचा खराब फॉर्म ही चिंतेची बाब मानली जात आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या राहुलला संघात कायम ठेवण्याबाबत निवडकर्त्यांना विचार करावा लागू शकतो. आगामी दौऱ्यात त्याला संधी दिली जाणार का, हे पाहावे लागणार आहे. रणजी ट्रॉफीच्या सामन्यांत राहुलला आपला फॉर्म सिद्ध करावा लागणार आहे. तरच त्याची वर्णी न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात लागू शकते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ