शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

प्रयागराजमध्ये जमिनीत पुरलेले नोटांनी भरलेले तीन निळे ड्रम सापडले, 60 कोटींचा अंदाज

प्रयागराजमध्ये जमिनीत पुरलेले नोटांनी भरलेले तीन निळे ड्रम सापडले, 60 कोटींचा अंदाज छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

मेरठच्या 'निळा ड्रम केस' नंतर आता उत्तर प्रदेशातच निळ्या ड्रममध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. प्रयागराजच्या नवाबगंजमध्ये 500 रुपयांच्या नोटांनी भरलेले तीन ड्रम जमिनीखाली पुरलेले आढळले असून पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे.

मेरठमधील 'सौरभ राजपूत हत्याकांड' म्हणजेच 'निळा ड्रम केस' या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. त्या घटनेनंतर आता उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा निळा ड्रम चर्चेत आला आहे. यावेळी मात्र एका निळ्या ड्रममध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. प्रयागराजमध्ये जमिनीखाली पुरलेले तीन ड्रम नोटांनी भरलेले सापडले.

नवाबगंजमधील बराईपूर गावात एका घराखाली 500 रुपयांच्या नोटांनी भरलेले तीन ड्रम पुरलेले आढळले. पोलिसांनी आतापर्यंत त्यातील 4 कोटी रुपये ताब्यात घेतले आहेत. एकूण रक्कम 60 कोटी रुपये असावी, असा अंदाज आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई पोलीस एका गुन्हेगारी प्रकरणातील आरोपी राकेश यादव याला अटक करण्यासाठी आणि मुद्देमाल जप्त करण्यासाठी प्रयागराजमधील नवाबगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बरई रामनगर गावात आले होते. तिथेच हे ड्रम सापडले.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, राजेश यादवचा भाऊ बबलू यादव गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात राहत होता. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागला, तेव्हा तो गावात आला. त्याच्यासोबत दोन मेहुणे आणि एक साडूही आले होते. प्राथमिक माहितीनुसार, जप्त केलेली रक्कम त्यांच्याचमार्फत आणली गेली, असे सांगितले जात आहे.

गंगानगरचे डीसीपी सोनम कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेतील आरोपी राजेश यादव आणि राकेश यादव यांना चोरी करताना अटक करण्यात आली. पैशांनी भरलेले निळे ड्रमही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी हा छापा व्हिडिओग्राफी करत टाकला.

या पैशांचा खरा स्रोत काय आहे आणि ते घरात लपवून का ठेवले होते, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सगळ्या बाजूंनी पुढील तपास करत आहेत.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ