सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:26 IST

फ्लिपकार्ट आता फूड डिलिव्हरीच्या बाजारात उतरणार, झोमॅटो आणि स्विगीसमोर नवे आव्हान

ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी फ्लिपकार्ट 'Eat-in by Minutes' या नावाने ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा आणण्याच्या तयारीत आहे. बंगळुरूत चाचणी सुरू आहे.

फ्लिपकार्ट आता फूड डिलिव्हरीच्या बाजारात उतरणार, झोमॅटो आणि स्विगीसमोर नवे आव्हान छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) आता ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत कपडे, मोबाईल आणि घरगुती सामान मागवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लिपकार्ट ॲपवरूनच ग्राहकांना आवडते गरमागरम खाणे मागवता येणार आहे. सध्या भारतातील फूड डिलिव्हरी बाजारात झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) यांचे वर्चस्व आहे. फ्लिपकार्टच्या या निर्णयामुळे या दोन्ही कंपन्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्ट ही नवी फूड डिलिव्हरी सेवा 'Eat-in by Minutes' या नावाने बाजारात आणू शकते. सध्या बंगळुरू शहरात या सेवेची चाचणी (टेस्टिंग) सुरू आहे आणि कंपनीत अंतर्गत पातळीवर जोरदार तयारी चालू आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही सेवा लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

कोणतीही नवी सेवा ग्राहकांपर्यंत नेण्यापूर्वी कंपनी सगळ्या गोष्टींची पूर्ण खात्री करून घेत आहे. सुरुवातीला काही मोजक्या कर्मचाऱ्यांसोबत सुरू केलेली ही टेस्टिंग आता मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. फ्लिपकार्टचे 8000 पेक्षा जास्त कर्मचारी सध्या या सेवेचा वापर करून ऑर्डर देत आहेत. यातून ॲपचा युजर एक्सपिरियन्स, ऑर्डरची प्रक्रिया आणि येणाऱ्या तांत्रिक अडचणी तपासून त्या सोडवल्या जात आहेत, जेणेकरून लॉन्चिंगच्या वेळी ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल.

ग्राहकांना यासाठी नवीन ॲप डाउनलोड करण्याची गरज पडणार नाही. फ्लिपकार्टच्या मुख्य ॲपमध्येच एक वेगळा टॅब दिला जाईल. त्यात वापरकर्त्यांना शॉपिंग आणि क्विक कॉमर्ससोबतच फूड डिलिव्हरीचाही पर्याय मिळेल.

खाद्यपदार्थांचे जास्तीत जास्त पर्याय ग्राहकांना देण्यासाठी फ्लिपकार्टने थेट रेस्टॉरंट्सशी भागीदारी करायला सुरुवात केली आहे. यात सरकारी पाठिंबा असलेल्या ONDC (Open Network for Digital Commerce) वर उपलब्ध असलेल्या रेस्टॉरंट्सचाही समावेश असेल. याशिवाय गरमागरम जेवण ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी कंपनी आपल्या ईकार्ट (Ekart) या लॉजिस्टिक्स युनिटच्या मदतीने वेगळे आणि मजबूत डिलिव्हरी नेटवर्क उभारत आहे.

सध्या भारतीय बाजारात झोमॅटो आणि स्विगी यांच्यातच स्पर्धा दिसते. प्लॅटफॉर्म फी आणि डिलिव्हरी चार्जेसमुळे ग्राहक अनेकदा त्रासलेले असतात. अशा वेळी फ्लिपकार्टसारख्या बलाढ्य ब्रँडची एन्ट्री झाली, तर ग्राहकांना जास्त पर्याय मिळतील आणि स्पर्धा वाढल्याने चांगल्या ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे. कंपनी यंदाच्या वर्षात देशातील काही ठराविक प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू करू शकते, अशी चर्चा आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ