शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:18 IST

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद, पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद

फ्लिपकार्टवर 'द बिग बिलियन डेज' सेल सुरू झाला असून पहिल्या तासात प्रत्येक 15 व्या भारतीय ऑनलाइन खरेदीदाराने प्लॅटफॉर्मला भेट दिली, तर नवीन ग्राहकांची संख्या 34 टक्क्यांनी वाढली.

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद, पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 'द बिग बिलियन डेज' सेल सुरू झाला असून ग्राहकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह विविध प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी या सेलमध्ये ग्राहकांना मिळत आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या या सेलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला.

फ्लिपकार्टच्या 13 व्या आवृत्तीतील सेलच्या पहिल्या तासातील अगदी पहिल्याच मिनिटाला एकाच वेळी 63 लाख यूजर्सची नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या सेलला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.

पहिल्या तासात प्रत्येक 15 व्या भारतीय ऑनलाइन खरेदीदाराने फ्लिपकार्टला भेट दिल्याची माहिती आहे. एखाद्या सामान्य तासाच्या तुलनेत सेलदरम्यान या प्लॅटफॉर्मवर 6 पट अधिक भारतीयांनी खरेदी केली. नवीन ग्राहकांची संख्या 34 टक्क्यांनी वाढली. फ्लिपकार्ट प्लस, ब्लॅक सदस्य आणि फ्लिपकार्ट को-ब्रँड कार्ड सदस्यांसाठी हा सेल 24 तास आधीच, म्हणजे 8 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता.

सेलदरम्यान ग्राहकांनी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, मोठे डिव्हाईस, सौंदर्य प्रसाधने, जीवनशैली आणि घरासाठीच्या वस्तूंची सर्वाधिक खरेदी केली. सेल सुरू झाल्यानंतरचा पहिला तास हा भारतात सणासुदीच्या ऑनलाइन खरेदीची मुळे खोलवर रुजल्याचा प्रबळ संकेत आहे. फ्लिपकार्ट देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना सेवा देत आहे.

प्रीमियम आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना सेलमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. परवडणाऱ्या किमतींमुळे स्मार्टफोनच्या खरेदीत स्पष्ट वाढ दिसली. चारपैकी एका ग्राहकाने उत्पादन एक्सचेंजचा पर्याय निवडला, तर तीनपैकी एकाने नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय घेतल्याची माहिती आहे. एंट्री-लेव्हल 5जी मॉडेल्सच्या किमतींमुळेही त्यांची जोरदार विक्री झाली.

पहिल्या तासात मोठ्या उपकरणांच्या विक्रीत वार्षिक तुलनेत 30 टक्के वाढ झाली. एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन यांसारख्या प्रोडक्ट्सना मोठी मागणी होती. टॅब्लेटच्या विक्रीत वार्षिक 73 टक्के वाढ झाली. सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीत वर्ष-दर-वर्ष 42 टक्के वाढ दिसून आली, यात पुरुषांचे ग्रूमिंग आणि सेल्फ-केअर उत्पादने आघाडीवर होती. सेलच्या उच्चांकाच्या वेळी दर मिनिटाला पुरुषांच्या परफ्यूमच्या 1600 हून अधिक युनिट्सची विक्री झाली.

फ्लिपकार्ट मिनिट्सवरही ग्राहकांची संख्या वाढली असून ऑर्डरच्या संख्येत 3.5 पट वाढ झाली. नवीन ग्राहकांची संख्या 11 पटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स, ग्रूमिंग आणि वेअरेबल्सच्या मागणीतही वाढ झाली. अर्ली ॲक्सेस दरम्यान फ्लिपकार्ट मिनिट्सच्या मदतीने नवी दिल्लीतील एका ग्राहकापर्यंत आयफोन 17 केवळ 3.4 मिनिटांत पोहोचला. एअर फ्रायर्स, लॅपटॉप्स आणि एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह्सची मागणीही वाढली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ