छोटासा तडा, पण नुकसान मोठं! तुटलेला टेम्पर्ड ग्लास अजूनही वापरताय?
स्मार्टफोनवर तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरत राहिल्यास स्क्रीनची सुरक्षा कमी होते, बोटांना इजा होऊ शकते आणि टचस्क्रीनवरही परिणाम होऊ शकतो.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
स्मार्टफोन हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं डिव्हाईस आहे. त्यातल्या वेगवेगळ्या फीचर्समुळे आपली अनेक कामं अगदी सहज होतात. फोनमधल्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे त्याची स्क्रीन. स्क्रीनवर स्क्रॅच पडू नये आणि ती तुटू नये, म्हणून अनेक लोक फोनवर टेम्पर्ड ग्लास लावतात.
कधी कधी फोन खाली पडतो किंवा एखाद्या टोकदार वस्तूवर आदळतो. तेव्हा टेम्पर्ड ग्लासला क्रॅक जाऊ शकतो किंवा तो तुटू शकतो. क्रॅक गेल्यानंतर किंवा ग्लास तुटल्यानंतरही काही लोक तोच ग्लास तसाच वापरत राहतात. तुम्हीही असंच करत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरल्यास फोनच्या स्क्रीनच्या सुरक्षेवर परिणाम होतो. असा ग्लास वापरल्यास स्मार्टफोनवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, ते आता पाहूया.
पहिला धोका म्हणजे स्क्रीनची सुरक्षा कमी होणं. मोबाईलच्या डिस्प्लेला स्क्रॅच आणि झटक्यांपासून वाचवणं हे टेम्पर्ड ग्लासचं मुख्य काम आहे. पण ग्लासला तडा गेला की त्याची मजबुती कमी होऊ लागते. अशा वेळी फोन पुन्हा पडला किंवा त्याला जोरात झटका बसला, तर डिस्प्लेचं नुकसान होऊ शकतं. तुटलेला ग्लास काही प्रमाणात सुरक्षितता देऊ शकतो, पण पूर्वीइतक्याच पातळीच्या संरक्षणाची खात्री तो देऊ शकत नाही. म्हणून तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरणं टाळा.
दुसरं मोठं नुकसान म्हणजे तीक्ष्ण आणि बाहेर आलेल्या कडा. तुटलेल्या ग्लासमधून काचेचे लहान तुकडे बाहेर आले, तर फोन वापरताना ते तुमच्या बोटांना लागू शकतात. त्यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते.
तिसरा परिणाम टचस्क्रीनवर होऊ शकतो. तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरल्याने फक्त स्क्रीनची सुरक्षा कमी होत नाही, तर मोबाईलच्या टचस्क्रीनवरही परिणाम होऊ शकतो. ग्लासचा एखादा भाग निघाला असेल किंवा तो डिस्प्लेवर दाब टाकत असेल, तर टचस्क्रीन वापरताना अडचण येऊ शकते. त्यामुळे स्क्रीनचा टच रिस्पॉन्स खराब होऊ शकतो.
स्क्रीनवर लाईन दिसत असतील किंवा डिस्प्लेमध्ये इतर कोणतीही समस्या असेल, तर फोन तपासून घ्या. तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासमुळे तुमच्या फोनचं नुकसान होऊ शकतं, म्हणून नेहमी चांगल्या प्रतीचा टेम्पर्ड ग्लास वापरा. त्यामुळे फोनची सुरक्षा वाढते.