मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:22 IST

पावर बँकचा स्फोट टाळायचाय? खरेदी आणि चार्जिंगच्या या चुका टाळा

पावर बँकची नीट काळजी घेतली नाही तर त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. खरेदी करताना आणि वापरताना काय लक्षात ठेवायचं ते पाहूया.

पावर बँकचा स्फोट टाळायचाय? खरेदी आणि चार्जिंगच्या या चुका टाळा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

आजकाल स्मार्टफोन आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. कॉलिंग, मेसेजिंग, चॅटींग, फोटोग्राफी अशी आपली अनेक कामं फोनवरच अवलंबून असतात. ही सगळी कामं अगदी सहज होतात, पण पूर्ण दिवस फोन वापरायचा असेल तर त्याची चार्जिंग टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे.

म्हणूनच अनेकजण पावर बँक वापरतात आणि प्रवासातही ती सोबत नेतात. पण तुम्हाला माहिती आहे का, पावर बँकची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे पावर बँक खरेदी करताना आणि वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

पहिली गोष्ट म्हणजे लोकल आणि स्वस्त पावर बँक. पैसे वाचवण्यासाठी बरेच लोक अशी पावर बँक घेतात. पण या गॅझेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची क्वालिटी अत्यंत खराब असते. शिवाय यामध्ये कोणतंही प्रॉपर सर्किट प्रोटेक्शनही मिळत नाही. अशा वेळी पावर बँकमध्ये ओव्हरलोड होण्याची, तापमान वाढण्याची आणि शॉर्ट सर्किट होण्याची भिती असते. अनेकदा याच कारणांमुळे स्मार्टफोनचाही ब्लास्ट होऊ शकतो. म्हणून नेहमी विश्वसनीय आणि चांगल्या कंपनीची पावर बँक खरेदी करा. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले तरी वापरताना तुम्ही सुरक्षित राहू शकता.

दुसरी चूक म्हणजे पावर बँक ऊन्हात ठेवणं. अनेक लोक नकळत चुकीच्या ठिकाणी पावर बँक ठेवतात, जसं की गाडीचा डॅशबोर्ड. घाईत असताना किंवा नकळतपणे आपण ती कारच्या डॅशबोर्डवर किंवा थेट ऊन येईल अशा जागी ठेवतो. ऊन्हाळ्यात गाडीचं तापमान वाढतं, त्यामुळे ऊन्हात ठेवलेली पावर बँक आणखी गरम होते. लिथियम-आयन बॅटरीची तापमान सहन करण्याची क्षमता संपली तर त्याचा ब्लास्ट होऊ शकतो.

आणखी एक सवय धोक्याची आहे. अनेक लोक पावर बँक चार्जिंगला लावतात आणि त्याच वेळी त्याच पावर बँकला फोनही चार्जिंगसाठी जोडतात. त्यानंतर फोनवर हेवी गेमिंग किंवा व्हिडीओ स्ट्रिमिंगही करतात. यामुळे गॅझेट्सवर दबाव पडतो आणि त्यात उष्णता वाढू शकते. त्यामुळे ब्लास्ट होण्याचा धोका असतो.

तिसरा मुद्दा म्हणजे जास्त वेळ चार्जिंग. पावर बँक चार्ज करण्यासाठी लोकल एडाप्टर वापरणं धोकादायक असू शकतं. तसंच पावर बँक चार्ज झाल्यानंतरही बराच वेळ प्लग इन ठेवणं असुरक्षित आहे. प्रत्येक पॉवर बँक विशिष्ट ॲम्पिरेज आणि व्होल्टेज रेटिंगसह येते. तरीही लोक अनेकदा ती रात्रभर चार्जिंगला लावून ठेवतात आणि फोनसाठी असलेला कोणताही 'फास्ट चार्जर' वापरतात.

पावर बँक पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर त्यामध्ये करंट बसू शकतो. ओवरचार्जिंगमुळे पावर बँकमधली बॅटरी फुगू शकते आणि ब्लास्ट होऊ शकतो. याशिवाय चुकीची किंवा डॅमेज झालेली केबल वापरून पावर बँक चार्ज केली तरीही ब्लास्ट होऊ शकतो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ