मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:51 IST

भारपायलीत दारूच्या नशेत पतीचा पत्नीवर खलबत्त्याने हल्ला केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

सावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे.

भारपायलीत दारूच्या नशेत पतीचा पत्नीवर खलबत्त्याने हल्ला केल्याचा आरोप, गुन्हा दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील भारपायली गावात एका पतीविरुद्ध पत्नीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, दारूच्या नशेत असलेल्या पतीने आधी दोन वर्षांच्या मुलीला मारहाण केली. त्याला विरोध केल्यावर त्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता मारल्याचा आरोप आहे. सावली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. अंकिता मयूर दंडीकवार (वय २१, रा. भारपायली, ता. सावली) यांचा विवाह मयूर शरद दंडीकवार (वय २५) याच्याशी झाला आहे. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मयूर दारू पिण्याच्या सवयीचा आहे. तो नेहमी नशेत पत्नीवर विनाकारण संशय घेऊन भांडण करायचा आणि मारहाण करायचा.

१९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जाते. अंकिता घरातल्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. तेव्हा किचनमधल्या खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी तिकडे जाऊन पाहिले, तर आरोपी मयूर मुलीला मारहाण करत असल्याचे दिसले. त्यावर अंकिता यांनी त्याला विचारले, "तुम्ही मुलीला कशाला मारता, ती लहान आहे, तिला काय समजते?"

फिर्यादीनुसार, यावर आरोपीने उद्धटपणे उत्तर दिले. "मी तुला आणि मुलीला ओळखत नाही, तू माझी पत्नी नाही आणि ही त्रिशा माझी मुलगी नाही, मी तिला मारून टाकेन, तू मला सांगणारी कोण?" असे म्हणत त्याने शिवीगाळ केली, असा आरोप आहे. त्यानंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करून किचनमध्ये ठेवलेला लोखंडी खलबत्ता उचलला आणि अंकिता यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला, असेही तक्रारीत म्हटले आहे.

या हल्ल्यात अंकिता यांचे डोके फुटले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, त्यामुळे त्या डोक्याला हात धरून खाली बसल्या. त्यानंतर आरोपीने "आता तू जर जास्त करशील तर तुला व मुलीला मारून टाकतो," अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

त्या वेळी घरातल्या सासू छाया दंडीकवार आणि नणंद साक्षी दंडीकवार तिथे आल्या. त्यांना पाहून आरोपी मयूर तिथून निघून गेला. काही वेळाने अंकिता यांनी वडील भास्कर बिटपल्लीवार यांना फोन करून झालेला प्रकार सांगितला आणि त्यांना बोलावून घेतले. वडिलांसोबत त्या सावली पोलीस ठाण्यात गेल्या आणि पतीविरुद्ध तक्रार नोंदवली.

अंकिता यांच्या तोंडी फिर्यादीवरून सावली पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी पहाटे १.२७ वाजण्याच्या सुमारास भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अजय विजयराव वडलावार करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ