बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:32 IST

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा १५ जणांचा संघ जाहीर, कुसल मेंडिस नवा कर्णधार

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने संघ जाहीर केला आहे. धनंजय डी सिल्व्हा यांनी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुभवी फलंदाज कुसल मेंडिसकडे नेतृत्व सोपवले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने आपला १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून तिथे दोन्ही संघांत ही दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या संघाचे नेतृत्व कुसल मेंडिस याच्याकडे असणार आहे.

धनंजय डी सिल्व्हा याने अचानक कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी कर्णधारपद सोडल्यानंतर निवडकर्त्यांनी अनुभवी फलंदाज असलेल्या मेंडिसवर विश्वास दाखवला आणि कसोटी संघाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली. कसोटी कर्णधार म्हणून कुसल मेंडिसची ही पहिलीच मालिका असणार आहे.

ही मालिका ९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तिची सुरुवात ९ नोव्हेंबरपासून रावळपिंडी येथे होईल. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसी अंतर्गत खेळवली जात आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे.

या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या निवडकर्त्यांनी संघात अनेक मोठे बदल केले आहेत. काही वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. खराब फॉर्म आणि तंदुरुस्तीच्या कारणांमुळे काही अनुभवी खेळाडूंना संघात जागा मिळालेली नाही. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही खेळाडूंनी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. अशा प्रकारे तरुण आणि अनुभवी खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे.

श्रीलंकेचा १५ जणांचा संघ असा आहे: कुसल मेंडिस (कर्णधार), पाथुम निसांका (फिटनेस मंजुरीवर आधारित), पसिंदु सोरियाबंदारा, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, धनंजय डी सिल्वा, अंजाला बंदारा (यष्टिरक्षक), सोनल दिनुषा, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, मिलन रथनायके, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका आणि ईशान मलिंगा.

आता नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ या मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ