ऑफिसमध्ये जेन झीच्या दहा सवयी: छोटे ब्रेक, हेडफोन आणि कामाची ठरलेली वेळ
सलग तासनतास खुर्चीला चिकटून बसण्याचा काळ मागे पडत आहे. मानसिक शांतता आणि स्मार्ट वर्कला महत्त्व देणारी जेन झी पिढी कॉर्पोरेट ऑफिसची संस्कृती बदलत आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट कामाच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जागेवरून न हलता सलग काम करणे म्हणजे इमानदारी समजली जात होती. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. जुन्या वर्क कल्चरची सवय असलेले लोक आजचे ट्रेंड पाहून थक्क होऊ शकतात. मॉडर्न ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच वेगळी ऊर्जा आणि नव्या प्रकारचे कल्चर दिसते. या नव्या कार्यसंस्कृतीचे नेतृत्व आजची तरुण पिढी, म्हणजेच 'जेन झी' करत आहे.
जेन झीचे तरुण पगारासाठी आपली मानसिक शांतता किंवा वैयक्तिक आयुष्याची किंमत मोजायला तयार नाहीत. काम हा आयुष्याचा फक्त एक भाग आहे, असे ते मानतात. उत्पादकतेबरोबरच मानसिक शांतता त्यांना खूप महत्त्वाची वाटते. त्यांच्या ऑफिस कल्चरमध्ये सर्वाधिक चर्चा 'मायक्रो ब्रेक्स'ची होते. जुने मॅनेजर याला कामातून पळ काढणे समजतात, पण आजचे तरुण त्याकडे स्वतःला रिचार्ज करण्याचा मार्ग म्हणून पाहतात. तासनतास स्क्रीनसमोर बसून राहण्यापेक्षा थोडे चालणे, स्ट्रेचिंग करणे किंवा कॉफी पिताना मित्रांशी गप्पा मारणे त्यांना गरजेचे वाटते.
नवी पिढी कामाबाबत अत्यंत स्पष्ट आहे. ती 'तास ढकलण्यावर' नव्हे, तर 'स्मार्ट वर्क'वर विश्वास ठेवते. त्यांच्या याच कार्यशैलीमुळे कॉर्पोरेट जगतात मोठ्या बदलाचा पाया रचला जात आहे. सीनियर आणि जुनियर यांच्यात वर्क कल्चरवरून नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जेन झीच्या ऑफिसमधील अशा दहा खास सवयी सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.
पहिली सवय मायक्रो ब्रेक्सची. सलग तासनतास खुर्चीवर बसून राहणे जेन झीला पसंत नाही. या पिढीतले तरुण दर ४५ ते ६० मिनिटांनी छोटासा ब्रेक घेतात, कधी पाणी पिण्यासाठी तर कधी थोडे चालण्यासाठी. यामुळे फोकस आणि सर्जनशीलता वाढायला मदत होते, असा त्यांचा विश्वास आहे. दुसरी सवय 'डिस्टर्ब करू नका' असे सांगणाऱ्या हेडफोनची. कानावर मोठे हेडफोन लावून काम करणे ही जेन झीची ओळख बनली आहे. त्यामुळे ऑफिसच्या गोंगाटापासून दूर राहून त्यांचा फोकस अधिक चांगला होतो. नको असलेल्या गप्पांपासून वाचण्याचा तो एक स्मार्ट मार्गही आहे.
तिसरी सवय वर्क-लाइफ बाउंड्रीची, म्हणजेच काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील रेषेची. जुन्या कर्मचाऱ्यांसारखे ऑफिसच्या वेळेनंतर बॉसचा फोन किंवा मेसेज आला की लगेच उत्तर द्यायचे, हे जेन झीला मान्य नाही. संध्याकाळ झाली की त्यांचे काम संपते आणि ते वैयक्तिक आयुष्याला किंवा आपले छंद जोपासण्याला वेळ देतात. चौथी सवय म्हणजे मेंटल हेल्थला सर्वांत वरचे स्थान देणे. आजची तरुण पिढी मानसिक आरोग्याशी कोणतीही तडजोड करत नाही. एखाद्या दिवशी जास्त ताण जाणवला तर ते उघडपणे 'मेंटल हेल्थ डे' किंवा सुट्टी घेण्याबद्दल बोलतात. जुन्या पिढीतले लोक याला अनेकदा बहाणा समजायचे.
पाचवी सवय सरळ आणि स्पष्ट संवादाची. ऑफिस पॉलिटिक्स किंवा गोल गोल फिरवून बोलण्यापेक्षा थेट बोलणे जेन झीला आवडते. मीटिंगमध्ये न घाबरता आपले विचार मांडणे आणि सीनियर्सना मोकळेपणाने प्रश्न विचारणे हे त्यांच्या स्वभावातच आहे. सहावी सवय फॉर्मल ड्रेस कोडपासून दूर राहण्याची. टाय आणि सूट-बुटाचा जमाना आता मागे पडत आहे. ही पिढी ऑफिसमध्ये कॅजुअल, आरामदायक आणि ट्रेंडी कपड्यांत येणे पसंत करते. त्यामुळे वर्कप्लेसवर रिलॅक्स वाटायला मदत होते.
सातवी सवय डेस्क आपल्या आवडीप्रमाणे सजवण्याची. जेन झीसाठी वर्क डेस्क म्हणजे फक्त लॅपटॉप ठेवण्याची जागा नसते. टेबलावर रोपे, आवडीचा कॉफी मग, मोटिव्हेशनल कोट्स किंवा मिनिमलिस्टिक डेकोरेशन ठेवायला ते पसंत करतात. त्यामुळे ऑफिसचे वातावरण आरामदायक वाटते. आठवी सवय 'वर्क बेस्टी'ची. ऑफिसचा ताण हलका करण्यासाठी जेन झी जवळच्या मित्रांचा, म्हणजेच 'वर्क-बेस्टी'चा एक मजबूत ग्रुप तयार करते. त्यांच्यासोबत लंच शेअर करणे आणि हसणे-खेळणे हा त्यांच्या दिवसाचा सर्वात चांगला भाग असतो.
नववी सवय फीडबॅक आणि कौतुकाची आस. ही पिढी फक्त काम करण्यासाठी काम करत नाही. आपल्या कामावर लगेच फीडबॅक आणि अप्रूवल मिळावे, अशी त्यांची अपेक्षा असते. चांगल्या कामाचे कौतुक झाले तर त्यांचा उत्साह दुप्पट होतो. दहावी सवय हायब्रिड आणि रिमोट वर्किंगला प्राधान्य देण्याची. वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड मॉडेलचा पर्याय देणाऱ्या कंपन्यांना जेन झी जास्त पसंती देते. ट्रॅफिकमध्ये आणि ऑफिसला येण्या-जाण्यात वेळ वाया घालवण्याच्या ते अगदी विरोधात आहेत.