बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

नेवाशात पारधी समाजाच्या दोन गटांत मारहाण, गोळीबारात एक गंभीर जखमी; दहा जणांवर गुन्हा

पोलिसांना खबऱ्या देत असल्याच्या संशयातून नेवासे बुद्रुकच्या साईनाथनगरमध्ये झालेल्या वादात रमेश छगन भोसले यांच्या पाठीत गोळी लागली; दोघांना अटक झाली आहे.

नेवाशात पारधी समाजाच्या दोन गटांत मारहाण, गोळीबारात एक गंभीर जखमी; दहा जणांवर गुन्हा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नेवासे बुद्रुक परिसरातील साईनाथनगरमध्ये शनिवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास पारधी समाजाच्या दोन गटांत झालेला वाद मारहाण आणि गोळीबारापर्यंत पोहोचला. पोलिसांना खबऱ्या देत असल्याच्या संशयातून हा वाद टोकाला गेल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत रमेश छगन भोसले यांच्या पाठीत गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी नेवासे पोलिसांत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सपना शहराम भोसले यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मामा रमेश छगन भोसले आणि त्यांचे मामा कल्याण भानुदास चव्हाण यांच्यात यापूर्वी वाद झाले होते. त्याबाबत त्यांची सून नेघा अभिषेक चव्हाण हिनेही पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे.

फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपींनी रमेश भोसले यांना "तू पोलिसाचा खबऱ्या होतो का, तू पोलीसांना आमच्या खबऱ्या देतो का, तुझा आता जिवच घेतो" असे म्हटले. त्यानंतर तलवार, कुऱ्हाड, कोयता आणि लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर, हातावर, पोटावर आणि पायावर मारहाण केली. याच दरम्यान अभिषेक उर्फ अभी कल्याण चव्हाण याने बंदुकीने रमेश भोसले यांच्या पाठीत गोळी झाडली, असेही फिर्यादीत नमूद आहे. धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

आरोपींनी पूर्वनियोजित आणि आक्रमक पवित्रा घेऊन हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. या हल्ल्यात रमेश भोसले यांच्यासह एक महिला आणि एक लहान मूल जखमी झाले. मध्यस्थीसाठी आलेले इंदू नारायण भोसले आणि सागर नारायण भोसले हे दोघेही जखमी झाले आहेत. मुख्य हल्लेखोराने बंदुकीतून गोळी झाडल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गोळी लागल्यामुळे रमेश छगन भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत.

सपना शहराम भोसले यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिस ठाण्यात कल्याण चव्हाण, कुणाल चव्हाण, अभिषेक चव्हाण, हरण चव्हाण, कोमल चव्हाण, रोहित चव्हाण, उमेश भोसले आणि आकाश चव्हाण यांच्यासह एकूण दहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी दोघा जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ