सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 19:13 IST

नवी मुंबईत पाणीकपात होणार नाही; आयुक्तांनी मांडले पाणी बचतीचे नियोजन

राज्य शासनाने १० टक्के पाणीकपातीचे आदेश दिले असतानाही नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत कपात होणार नाही, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे.

नवी मुंबईत पाणीकपात होणार नाही; आयुक्तांनी मांडले पाणी बचतीचे नियोजन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवी मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्य शासनाने सर्व महानगरपालिकांना १० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत कोणतीही पाणीकपात होणार नाही, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे.

शहराला होणारा पाणीपुरवठा, धरणातील साठा आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी या विषयांवर महापालिकेच्या तहकूब महासभेत चर्चा झाली. पाण्याच्या नियोजनाच्या विषयावर झालेल्या या चर्चेत शुक्रवारी महापौर सुजाता पाटील आणि सभागृह नेते सागर नाईक यांनी आयुक्तांना पाणीकपात न करण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनी पाण्याच्या नियोजनावर भर देत, पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे सभागृहात सांगितले.

आयुक्तांनी मोरबे धरणाची माहिती सभागृहासमोर ठेवली. या धरणाचा एकूण संकल्पित साठा १९० दशलक्ष घनमीटर आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार धरणात १६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. शहरात दरमहा सुमारे १४.४० दशलक्ष घनमीटर पाणी वापरले जाते. धरणात ५.५२ दशलक्ष घनमीटर मृत साठा आहे.

पाणी बचतीसाठी विभागनिहाय विशेष पथके तयार केली जात असून प्रत्येक प्रभागात ती तैनात केली जात आहेत. अनधिकृत नळ जोडण्या शोधून त्या तोडणे, दंडात्मक कारवाई करणे आणि पाणी गळती थांबवणे हे या पथकांचे काम असेल. या पथकांचे नेतृत्व सहायक आयुक्त करणार आहेत.

बांधकाम क्षेत्र, सर्व्हिस सेंटर्स आणि कार वॉशिंग सेंटर्स यांना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले जात आहे. तसेच सर्व विहिरींचे पुनरुज्जीवन करून त्यातील पाणी स्वच्छता गृह, गार्डनिंग आणि धुण्याच्या कामासाठी वापरले जाणार आहे.

शहरातील उद्यानांना १०० टक्के एसटीपी प्रक्रिया केलेलेच पाणी दिले जाणार आहे. वाशी आणि नेरूळ येथील उद्यानांचे राहिलेले प्रकल्प पुढील दोन महिन्यांत पूर्ण केले जातील. जुने १०७ जलकुंभ बदलून त्यांच्या जागी ३३ नवीन जलकुंभ उभारले जात असून त्यांची बांधकामे वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहेत.

पाण्याच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी स्कॉडा प्रणाली वापरली जात आहे. बेलापूर येथे सुरू असलेल्या २४/७ पाणीपुरवठा योजनेमुळे १५ ते २० टक्के पाण्याची बचत होण्याची अपेक्षा आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ