सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 19:52 IST

नवितासमध्ये स्विस कंपनी रिस्पॉन्सिबिलिटीची २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक, सोलर सेल प्रकल्पाला गती

भारतातील नियोजित २.२ गिगावॅट क्षमतेच्या सोलर सेल उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारासाठी नवितासने स्विस इम्पॅक्ट ॲसेट मॅनेजर रिस्पॉन्सिबिलिटीकडून ग्रोथ कॅपिटल उभारले आहे.

नवितासमध्ये स्विस कंपनी रिस्पॉन्सिबिलिटीची २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक, सोलर सेल प्रकल्पाला गती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतातील आघाडीचा एकात्मिक अक्षय ऊर्जा प्लॅटफॉर्म असलेल्या नवितासने स्विस इम्पॅक्ट ॲसेट मॅनेजर रिस्पॉन्सिबिलिटीकडून मोठी गुंतवणूक उभारल्याची घोषणा केली आहे. रिस्पॉन्सिबिलिटीने आपल्या गुंतवणूकदारांच्या वतीने नविताससाठी २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंतचे ग्रोथ कॅपिटल दिले आहे.

हा पैसा नवितासच्या भारतातील नियोजित २.२ गिगावॅट क्षमतेच्या सोलर सेल उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे कंपनीला सौर मूल्य साखळीत मोठे 'बॅकवर्ड इंटिग्रेशन' साधता येईल आणि एकात्मिक स्वच्छ-ऊर्जा उत्पादन प्लॅटफॉर्म उभारणेही शक्य होणार आहे.

ही गुंतवणूक रिस्पॉन्सिबिलिटीच्या 'एशिया क्लायमेट फंडा'चा भाग आहे. भारत सध्या देशांतर्गत अक्षय ऊर्जा उत्पादनाची परिसंस्था अधिक मजबूत करत आहे आणि सौर उपकरणांच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी करत आहे. अशा वेळी ही गुंतवणूक झाली आहे.

नवितासने याआधीच सोलर मॉड्यूल्स, एन्कॅप्सुलंट मॅन्युफॅक्चरिंग, ईपीसी सेवा, बीईएसएस आणि अक्षय ऊर्जा निर्मिती या क्षेत्रांत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. पुढच्या टप्प्यात वेफर आणि इनगॉट उत्पादनात विस्तार करून सौर पुरवठा साखळी आणखी मजबूत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

या गुंतवणुकीबाबत बोलताना नवितासचे डायरेक्टर विनीत मित्तल म्हणाले, "रिस्पॉन्सिबिलिटीचे संस्थात्मक भागीदार म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. सोलर सेल्समधील आमचे बॅकवर्ड इंटिग्रेशन देशांतर्गत पुरवठा साखळी अधिक दृढ करेल. उच्च कार्यक्षमतेच्या 'टॉपकॉन' तंत्रज्ञानावरील आमचे काम आणि 'पेरोव्हस्काइट-टॉपकॉन' हायब्रिड टँडम मॉड्यूल्सबाबत सेलक्ससोबतचा आमचा सहयोग जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्याची आमची महत्त्वाकांक्षा दर्शवतो."

नवितासचे सीओओ विजय मेनन यांनी सांगितले की, कंपनी आपली वाढ फक्त महसूल किंवा नफ्यावरून मोजत नाही. ती वाढ किती जबाबदारीने, शाश्वतपणे आणि प्रबळ कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मदतीने साधली जाते, याला नवितास प्राधान्य देते.

नवितासचे फायनान्स हेड कार्तिक जैन यांनी नमूद केले की, या गुंतवणुकीमुळे कंपनीची आर्थिक लवचिकता वाढेल. तसेच सौर परिसंस्थेतील नवितासच्या अंमलबजावणी क्षमतेवर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचेही यातून दिसते, असे त्यांनी सांगितले.

रिस्पॉन्सिबिलिटीच्या क्लायमेट इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट्सचे प्रिन्सिपल जय बाठीजा यांच्या म्हणण्यानुसार, सोलर मॉड्यूल उत्पादनातील नवितासच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर सेल उत्पादनातील विस्तार हे स्वाभाविक पुढचे पाऊल आहे. भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि देशांतर्गत उत्पादनाच्या महत्त्वाकांक्षेत सहभागी होताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्यवहारात मुंबईस्थित सेंट्रम कॅपिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चर ॲडव्हायझरी विभागाने नविताससाठी एकमेव आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ