सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 18:14 IST

नागपुरात घरात नकली नोटांची छपाई; घरमालकाच्या खबरीमुळे प्रकरण उघड

नागपुरात एका घरात नकली नोटा छापल्या जात असल्याचे घरमालकाच्या माहितीमुळे समोर आले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

नागपुरात घरात नकली नोटांची छपाई; घरमालकाच्या खबरीमुळे प्रकरण उघड छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपुरात एका घरात नकली नोटा छापल्या जात असल्याचे समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही खबर पोलिसांना खुद्द घरमालकानेच दिली. नोटा छापण्यासाठी लागणारे कागद घरमालकाने पाहिले होते. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधून सगळी माहिती सांगितली.

नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. बनावट नोटांच्या या प्रकरणात एटीएस कारवाई करत आहे. आरोपी घरात प्रिंटर आणून नोटा प्रिंट करायचे, पण त्यांच्याकडच्या नोटांची गुणवत्ता चांगली नव्हती, असे ते म्हणाले.

शेअर मार्केटमध्ये या लोकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. म्हणूनच ते नकली नोटा छापण्याकडे वळले, असे नांगरे पाटील यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत नागपूर ग्रामीणमधील खापरखेडा येथील एका प्रकरणाच्या तपासाबद्दल त्यांना विचारण्यात आले. त्यावर पोलीस आयुक्तांनी सूचक शेरा मारला. आरोपी करेक्ट टप्प्यात येण्याची आम्ही वाट पाहत आहोत, तो करेक्ट टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करणार, असे खुमासदार उत्तर त्यांनी दिले. पोलीस टप्प्यात आल्यावरच करेक्ट कार्यक्रम करतात, असेही ते म्हणाले आणि त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

याच पत्रकार परिषदेत ड्रग सिंडिकेटबद्दलही माहिती देण्यात आली. नागपूरच्या ड्रग सिंडिकेटमधील मुख्य नाव असलेला आणि नावावर 45 गुन्हे दाखल असलेला विशाल उर्फ फल्ली गुप्ता याला अटक करण्यात नागपूर पोलिसांना अखेर यश आले आहे. त्याबद्दल नांगरे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नागपूर पोलिसांनी गेल्या चार आठवड्यांत चार गँगवर एनडीपीएस कायद्यांतर्गत मोक्का लावला आहे. नशामुक्त नागपूरच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे, असे नांगरे पाटील यांनी सांगितले.

पोलिसांच्या कामगिरीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत 87 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. एटीएस आणि पोलिसांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली होती आणि त्यावेळी आरोपीला अटक झाली होती. नागपुरातील ढोमणे ज्वेलर्समधील चोरीप्रकरणी आरोपीला अंदमान निकोबार येथून अटक करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी उत्तरप्रदेशातील शिवा शर्मा मर्डर केसप्रकरणी श्रद्धा दुबेसह दोघांना अटक झाली. सणासुदीच्या काळात वाहतुकीवर पोलिसांचे अधिक लक्ष राहणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ