सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 184 | Moderate 14:08 IST

नागपुरातील नकली नोटांसारख्या कागदांच्या प्रकरणात नवी माहिती; पुष्पम बंडा अजूनही फरार

नागपूरच्या चैतन्येश्वर नगरातील घरात नोटांसारखे छापलेले कागद सापडल्याच्या कथित प्रकरणात स्थानिकांनी नवे दावे केले आहेत, तर संशयित पुष्पम बंडा फरारच आहे.

नागपुरातील नकली नोटांसारख्या कागदांच्या प्रकरणात नवी माहिती; पुष्पम बंडा अजूनही फरार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूरच्या चैतन्येश्वर नगरातील एका घरात मोठ्या प्रमाणावर नकली नोटांसारखे छापलेले कागद सापडल्याच्या कथित प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पुष्पम बंडा हा अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक लोकांनी या प्रकरणाबद्दल काही खळबळजनक दावेही केले आहेत.

परिसरातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार पुष्पम बंडा आजूबाजूच्या कोणाशीही फारसा संपर्क ठेवत नव्हता. एवढेच नाही, तर तो घरमालकालासुद्धा घराच्या आत येऊ देत नव्हता. शिवाय गेल्या अनेक महिन्यांपासून त्याने घराचे भाडेही थकवले होते.

भाडे थकल्यामुळे शनिवारी घरमालकाने काही शेजारी आणि मनसेचे स्थानिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन घर उघडून पाहिले. तेव्हा घराच्या आत पाचशेच्या खऱ्या नोटांसारखे दिसणारे छापलेले कागद मोठ्या प्रमाणावर दिसले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर पाचशेच्या नोटांसारखी दोन्ही बाजूंना छपाई असलेले सुमारे 37 लाख रुपये मूल्याचे कागद सापडले. शिवाय नोटेची फक्त एक बाजू छापलेले सुमारे 45 लाख मूल्याचे कागदही तिथे आढळले.

पुष्पम बंडाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर असे कागद का छापले असावेत, याबद्दल अजून स्पष्टता नाही. मात्र त्याची वागणूक पाहता तो मोठ्या प्रमाणावर असलेल्या खऱ्या नोटांमध्ये काही संख्येने हे छापलेले कागद मिसळून व्यवहारात आणत असावा, अशी शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे अनेक महिन्यांचे भाडे थकवणाऱ्या पुष्पमने नुकतेच एका बँकेत एक लाख रुपये जमा केल्याचे त्याच्या घरी सापडलेल्या बँकेच्या कागदपत्रावरून दिसून आले आहे. त्यामुळे नोटांसारखे दिसणारे एवढे कागद तो कुठे वापरत होता, याबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

घरमालकांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, पुष्पम बंडाने यापूर्वीही भाडे देण्याच्या मुद्द्यावरून घरमालकासोबत वाद घातला होता आणि त्यांना धमकी देताना चाकू दाखवला होता. त्याची रीतसर तक्रार वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये करूनही पोलिसांनी तेव्हा कुठलीही कारवाई केली नव्हती.

जर पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती, तर नकली नोटांचे हे प्रकरण तेव्हाच समोर आले असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सध्या पुष्पम बंडा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ