मुख्यमंत्री फडणवीस आज नरखेडच्या लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी करणार, रात्री मुक्काम
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. रात्री ते गावातच राहतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाची दिवाळी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत साजरी करणार आहेत. नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा या गावात ते आज रात्री शेतकऱ्यांमध्ये असतील आणि रात्री त्याच गावात मुक्काम करतील. त्यासाठी मुख्यमंत्री आज संध्याकाळी नागपूरहून लोहारी सावंग्याकडे निघतील, अशी माहिती आहे.
देशभरात दिवाळीचा मोठा उत्साह दिसत आहे. पण यंदा राज्यावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा धीर या निमित्ताने दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
गावात रात्री मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी थेट बोलतील. शेतीच्या समस्या, सिंचन, पीक विमा आणि इतर स्थानिक प्रश्नांवर ते चर्चा करतील. शेतकऱ्यांच्या समस्या ते ऐकून घेतील आणि त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करतील. दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे, त्यांना धीर मिळावा आणि सुख-दु:खात शासन आपल्यासोबत आहे ही भावना वाढावी, या हेतूने मुख्यमंत्री दिवाळीला त्यांच्यासोबत असणार आहेत. शेतकऱ्यांच्या भावना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. थेट मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची संधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
उद्या सकाळी, म्हणजे रविवारी, मुख्यमंत्री नरखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतील, अशी माहिती आहे. परतीच्या प्रवासात काही गावांत थांबून ते शेतीची पाहणी करतील आणि जलसंधारणाच्या कामांचा आढावाही घेतील, असेही सांगितले जात आहे.
राज्यात यंदा भीषण दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारला पूर्ण सहानुभूती आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक मंत्र्याने किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत सण साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात दिवाळी साजरी करणार, याची यादी अशी आहे. देवेंद्र फडणवीस उद्या किंवा परवा नागपूरमध्ये असतील. चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत, तर आशिष शेलार १० नोव्हेंबरला रायगडमध्ये असतील. आकाश फुंडकर कन्फर्म करून सांगतील. पंकज भोयर वर्धा, मेघना बोर्डीकर परभणी, शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा आणि पंकजा मुंडे जालना येथे दिवाळी साजरी करतील.
जयकुमार गोरे ९ तारखेला पंढरपूर येथे सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. १० तारखेला माण खटाव येथे ते शेतकऱ्यांसोबत असतील आणि ११ तारखेला पुन्हा सोलापूरमध्ये एखाद्या गावात दिवाळी साजरी करतील. मंगलप्रभात लोढा आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी करणार आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.