शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:34 IST

ऑक्टोबरचा चटका वाढला, कोकणातील जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट

आज 9 ऑक्टोबरला कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट आहे, तर इतर विभागांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

ऑक्टोबरचा चटका वाढला, कोकणातील जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. लोकांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. यंदा मान्सूनच्या हंगामात पाऊस कमी पडल्यामुळे काही भागांत दुष्काळासारख्या परिस्थितीची चिंता वाढली आहे. परतीच्या पावसाकडूनही अपेक्षित दिलासा मिळताना दिसत नाही.

आज, 9 ऑक्टोबरला कोकणासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामानात थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे. कोकणातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. इतर भागांत मात्र प्रामुख्याने कोरडे हवामान राहील, असा अंदाज आहे.

कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव जाणवू शकतो. उपलब्ध अंदाजानुसार या जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा आहे. मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे, तर ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण व दमट वातावरण राहील. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात दुपारी उन्हाचा कडाका वाढू शकतो, आणि काही ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी येऊ शकतात. 10 ऑक्टोबरलाही कोकणातील स्थिती साधारण अशीच राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान असेल. पावसाचा विशेष इशारा नाही, पण उष्ण आणि दमट वातावरणामुळे लोकांना त्रास होऊ शकतो. काही ठिकाणी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळू शकतात. मात्र संपूर्ण विभागात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. या भागात कमाल तापमान सुमारे 32 अंश, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहील. पावसाचा विशेष अलर्ट नसला, तरी तापमानात वाढ जाणवू शकते. कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पावसाने उघडीप दिलेलीच असल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा विशेष इशारा नाही आणि हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. काही भागांत उष्ण आणि दमट वातावरण जाणवू शकते. कमाल तापमान 32 ते 34 अंश, तर किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

एकूण पाहिले तर राज्यात पावसाची उघडीप कायम आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे, तर इतर विभागांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहील. काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या तरी सर्वदूर पावसाची चिन्हे नाहीत. वाढत्या उष्णतेमुळे लोकांनी पुरेसे पाणी प्यावे, शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे.

पुढील दहा दिवसांचा तापमानाचा अंदाजही देण्यात आला आहे. 10 ऑक्टोबरला कमाल 36 आणि किमान 27 अंश सेल्सियस, 11 ऑक्टोबरला कमाल 36 आणि किमान 28 अंश, 12 ऑक्टोबरला कमाल 36 आणि किमान 28 अंश, तर 13 ऑक्टोबरला कमाल 35 आणि किमान 26 अंश सेल्सियस राहील. 14 आणि 15 ऑक्टोबरला कमाल 37 आणि किमान 28 अंश, 16 ऑक्टोबरला कमाल 36 आणि किमान 27 अंश, 17 ऑक्टोबरला कमाल 36 आणि किमान 26 अंश, 18 ऑक्टोबरला कमाल 36 आणि किमान 28 अंश, तर 19 ऑक्टोबरला कमाल 37 आणि किमान 28 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ