रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
14:33 IST

कुडाळमध्ये रस्त्याचे काम अर्धवट; १५ ऑक्टोबरपूर्वी सुरुवात न केल्यास अधिकाऱ्यांना गावात फिरकू न देण्याचा

जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये इंदिरानगर चौक ते संभाजी महाराज चौक रस्त्याचे काम रखडले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतरही काम पूर्ण न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

कुडाळमध्ये रस्त्याचे काम अर्धवट; १५ ऑक्टोबरपूर्वी सुरुवात न केल्यास अधिकाऱ्यांना गावात फिरकू न देण्याचा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मेढा : जावळी तालुक्यातील कुडाळ गावात इंदिरानगर चौक ते बाजारपेठ मार्गे संभाजी महाराज चौक हा गावातील महत्त्वाचा अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्याचे काम गेल्या काही काळापासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. काम रखडल्यामुळे गावातील नागरिक संतापले असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना थेट इशारा दिला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी या कामाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली होती. त्या वेळी गणेशोत्सव संपल्यानंतर तातडीने आणि जलद गतीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गणेशोत्सव कालावधीत बैठकीनंतर हे काम पूर्ण केले जाईल, असेही सांगितले गेले होते.

प्रत्यक्षात मात्र गणेशोत्सव संपून नवरात्रोत्सव सुरू झाला तरी काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे हे गाव पंचायत समिती सभापतींचे आहे. सभापतींच्या गावातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने या प्रश्नाला अधिक महत्त्व आले आहे.

रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे बाजारपेठ परिसरात धूळ उडते, वाहतुकीची गैरसोय होते आणि ये-जा करताना नागरिकांचा त्रास वाढला आहे. या मार्गावरून बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांची वर्दळ सुरू असताना धुळीचे लोट उठत असल्याने दुकानदार आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.

कुडाळचा शाही दसरा आणि नवरात्रोत्सव लवकरच सुरू होत असून या उत्सवाला कुडाळ परिसरात मोठे महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात महिला आणि ग्रामस्थ धार्मिक परंपरेनुसार नऊ दिवस अनवाणी प्रदक्षिणा घालतात. अशा वेळी रस्त्यावरील धूळ, खडी, माती आणि अर्धवट कामामुळे निर्माण झालेली परिस्थिती नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर घालणारी ठरणार आहे. "नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही," असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कुडाळमधील संतप्त नागरिकांनी आता स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, १५ ऑक्टोबरपूर्वी या कामाला सुरुवात न केल्यास अधिकारी आणि कर्मचारी यांना गावात फिरकू दिले जाणार नाही. गणेशोत्सवाच्या काळात आश्वासन देऊनही काम पूर्ण झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ