दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

जिवतीत आदिवासी बांधवांसोबत दिवाळी, धानोरकर आणि धोटे यांचा संवाद

जिवतीत आदिवासी बांधवांसोबत दिवाळी, धानोरकर आणि धोटे यांचा संवाद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिवती येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. दोन्ही नेत्यांनी तिथल्या लोकांशी जिव्हाळ्याने संवाद साधला आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जिवती परिसरातील आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.

धोटे हे काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आहेत. दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांची रोषणाई आणि आनंदाचा सण नाही, तर प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि माणुसकीची नाती अधिक घट्ट करणारा सण आहे, या भावनेतून दोघांनी हा कार्यक्रम उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला. या उपक्रमातून सामाजिक एकात्मता, आपुलकी आणि सर्वांना सामावून घेण्याचा संदेश दिला गेला.

धानोरकर यांनी आपल्या भावना मांडताना सांगितले की, दिवाळी हा आनंद, प्रेम आणि माणुसकीचा सण आहे. समाजातील प्रत्येकाला सन्मानाने आणि आनंदाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. आदिवासी बांधव हा आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे, त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाचे प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि आपुलकीचे नाते अधिक घट्ट करणे हाच या सणाचा खरा आनंद आहे, असे धानोरकर यांनी नमूद केले.

धोटे यांनी सांगितले की, दिवाळीचा खरा आनंद समाजातील प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाचा प्रकाश पोहोचवण्यात आहे. विशेषतः आदिवासी, वंचित आणि ग्रामीण भागातील बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या हक्कांसाठी व सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करत राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि त्याच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश आला, तरच दिवाळी साजरी केल्याचे खरे समाधान मिळते, अशी भावना धोटे यांनी व्यक्त केली. आदिवासी बांधवांशी असलेले हे जिव्हाळ्याचे नाते फक्त सणापुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भीमराव पाटील मडावी, लक्ष्मीकांत कोटनाके, सत्तारशह कोटनाके, सुधाकर नागोसे, अमोल कांबळे, माधव डोईफोडे, परशुराम पांचाळ, तजुद्दीन शेख, तिरुपती पोले, गणेश शेठकर, शिवाजी श्रीरामे, गणेश वाघमारे, माधव शेबळे, प्रदीप काळे, शब्बीर पठाण, अकबर शेख, पांडुरंग होंडबे, रवी दुलगुंडे आणि मनोज अरगेलवार उपस्थित होते. त्यांच्यासह जिवती परिसरातील आदिवासी बांधव आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ