शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:28 IST

जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नाही; दिल्लीत 35 हजारांहून अधिक जवान तैनात होण्याची शक्यता

कॉक्रोच जनता पार्टीच्या 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाला परवानगी दिलेली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले असून, सीसीटीव्ही, ड्रोन आणि फेशियल रेकग्निशन सिस्टिम्ससह मोठ्या बंदोबस्ताची तयारी सुरू आहे.

जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नाही; दिल्लीत 35 हजारांहून अधिक जवान तैनात होण्याची शक्यता छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कॉक्रोच जनता पार्टीकडून (CJP) 10 ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलन होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी देशभरात वातावरण तापलेले असतानाच आंदोलकांनी आता जंतर मंतर येथे मोर्चा वळवला आहे. मात्र या आंदोलनाला परवानगी दिलेली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले असून त्यांनी बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.

राजधानीत दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे 35 हजारांहून अधिक जवान तैनात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या पथकांना विशेष सूचना दिल्याचे वृत्त आहे. निदर्शने करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेण्याबाबत या सूचना असल्याचे सांगितले जात आहे. तैनातीच्या नियोजनासाठी संबंधित संचालनालयांनाही पत्रे पाठवण्यात आली आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, आंदोलनाच्या वेळी तैनात होणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) तुकड्यांना शस्त्रे न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच वेळी पोलीस पथकांना लाठ्या किंवा बॅटन बाळगण्याची परवानगी असेल. निदर्शकांशी शाब्दिक वाद घालू नये, अशाही सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित करण्याचे कथित प्रयत्न होऊ शकतात, अशी शक्यता या सूचनांमागे असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलनादरम्यान निदर्शकांना ताब्यात घेतल्यास त्यांना सहा निश्चित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये छत्रसाल स्टेडियम, राजीव गांधी स्टेडियम, यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सूरजमल स्टेडियम, कम्युनिटी सेंटर दौलतपूर आणि कम्युनिटी सेंटर पांड्रावल यांचा समावेश आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि हरियाणातून अतिरिक्त महिला पोलीस कर्मचारीही बोलावण्यात आल्याची माहिती आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीमध्ये अनेक फेशियल रेकग्निशन सिस्टिम्स (FRS), अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. काही इमारतींच्या छतांवर निरीक्षक तैनात करून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचीही तयारी आहे.

या आंदोलनात विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय गट सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. सीजेपीने जाहीर केलेल्या आंदोलनाला परवानगी नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनाच्या दिवशी प्रत्यक्षात किती जवान तैनात केले जातात आणि परिस्थिती कशी राहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ