शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:57 IST

भारत विरुद्ध झिम्बाब्वे: स्मृती मानधना उद्यापासून कर्णधार म्हणून पहिल्यांदाच मैदानात

हरमनप्रीत कौर यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय महिला संघाची धुरा स्मृती मानधना यांच्याकडे आली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध रायपूरमध्ये उद्यापासून तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे: स्मृती मानधना उद्यापासून कर्णधार म्हणून पहिल्यांदाच मैदानात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतीय महिला क्रिकेट संघ उद्यापासून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका उद्यापासून छत्तीसगडमधील रायपूर येथे खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण तीन सामने होणार आहेत, आणि त्यातला पहिला सामना उद्या होणार आहे.

या मालिकेत भारतीय संघात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हरमनप्रीत कौर यांनी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर, संघाची धुरा आता स्टार फलंदाज स्मृती मानधना यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून त्यांच्या या नव्या प्रवासाची सुरुवात उद्यापासून होणार आहे. स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार असून, मालिका जिंकून कर्णधारपदाची विजयी सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

स्मृती मानधनाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व केले आहे. तिच्या कप्तानीखाली संघाने दोन वेळा महिला प्रीमियर लीग (WPL) चे विजेतेपद मिळवले आहे. या लीगमधील तिच्या उत्कृष्ट नेतृत्वाचा आणि अनुभवाचा फायदा आता भारतीय राष्ट्रीय संघाला होईल. संघाची संपूर्ण जबाबदारी आता तिच्या हाती असणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची नवीन कर्णधार स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. महिला क्रिकेटमधील टी-२० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक रन्स करणारी फलंदाज म्हणून ती समोर आली आहे. तिने आतापर्यंत १७९ T-20I सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये ४,८६७ रन्स केल्या आहेत.

भारतीय संघ असा आहे: स्मृती मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा (उपकर्णधार), निकी प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतिमणी कलिता आणि मिन्नू मणी.

झिम्बाब्वेचा संघ असा आहे: जोसेफिन न्कोमो (कर्णधार), बिलेव्ड बिज़ा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलिस न्धलोवु, मिशेल मावुंगा, फ्रांसिस्का चिपारे, ओलिंडर चारे, कुदजाई चिगोरा, न्याशा ग्वांजुरा, नोमवेलो सिबांडा, लॉरिन फिरी, चियेड्जा धुरुरु, मोडेस्टर मुपाचिकवा, टेंदाई माकुशा आणि शार्ने मेयर्स.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ