मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:23 IST

अ‍ॅपलचा २८ ऑक्टोबरला नवा ईव्हेंट; टचस्क्रीन ओएलईडी मॅकबुक प्रोची सर्वाधिक चर्चा

टेक क्षेत्रातील बडी कंपनी अ‍ॅपलने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नवा मीडिया ईव्हेंट ठेवला असून आमंत्रणे पाठवायला सुरुवात केली आहे.

अ‍ॅपलचा २८ ऑक्टोबरला नवा ईव्हेंट; टचस्क्रीन ओएलईडी मॅकबुक प्रोची सर्वाधिक चर्चा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

टेक क्षेत्रातील बडी कंपनी अ‍ॅपल पुन्हा एकदा मोठ्या घोषणेसाठी तयार झाली आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी एका ईव्हेंटचे आयोजन केले आहे. हा नवा ईव्हेंट 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या आगामी मीडिया ईव्हेंटसाठी कंपनीने आमंत्रणे पाठवायलाही सुरुवात केली आहे.

"प्रो अँड टेल" (Pro and tell) अशी या ईव्हेंटची टॅगलाईन आहे. या कार्यक्रमात कंपनी मॅकबुक प्रो, आयमॅक आणि आयपॅड मिनीसह नवीन डिव्हाईस लाँच करणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्वात जास्त चर्चा कंपनीच्या पहिल्या टचस्क्रीन ओएलईडी मॅकबुक प्रोची सुरू आहे. मात्र कंपनीने या डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची तारीख याबद्दल अजून कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

पहिला टचस्क्रीन ओएलईडी मॅकबुक प्रो : रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की कंपनी आपल्या आगामी ईव्हेंटमध्ये नवीन मॅकबुक प्रो सादर करू शकते. 14 इंच आणि 16 इंच स्क्रीनची नवी मॉडेल्स येण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमध्ये पहिल्यांदाच ओएलईडी डिस्प्ले आणि टचस्क्रीन सपोर्ट दिला जाऊ शकतो. आतापर्यंत मॅकबुकमध्ये ट्रॅकपॅड आणि कीबोर्ड यांसारखे पर्याय पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे टचस्क्रीन आला, तर मॅकबुकच्या डिझाइनमध्ये आणि वापरण्याच्या पद्धतीत मोठा बदल होऊ शकतो.

एवढेच नाही, तर या नव्या मॉडेलमध्ये आयफोनसारखा डायनॅमिक आयसलँड इंटरफेस मिळू शकतो. ओएलईडी पॅनलमुळे कॉन्ट्रास्ट अधिक चांगला आणि डीप ब्लॅक कलर मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार या प्रीमियम मॉडेलमध्ये M5 Pro आणि M5 Max चिपसेट असू शकतो. एंट्री-लेवल 14 इंच मॅकबुक प्रोमध्ये मात्र M6 चिप मिळू शकते.

नवा आयमॅक : कंपनी या आगामी ईव्हेंटमध्ये नवीन 24 इंच आयमॅकही नव्या प्रोसेसरसह लाँच करण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार या डिव्हाईसमध्ये M6 चिप असू शकते. डिझाईनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाही. कंपनीचा भर प्रोसेसर आणि परफॉर्मन्सवर जास्त असणार आहे.

ओएलईडी डिस्प्लेचा नवा आयपॅड मिनी : कंपनी या नव्या ईव्हेंटमध्ये ओएलईडी डिस्प्लेचा नवा आयपॅड मिनीही लाँच करू शकते. काही रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की या डिव्हाईसमध्ये ओएलईडी डिस्प्लेसोबत अपडेटेड A-सीरीज प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यासोबतच फ्रंट कॅमेरा लँडस्केप स्थितीत हलवला जाऊ शकतो आणि स्पीकर सिस्टममध्येही बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ कॉलदरम्यान टॅब्लेट वापरणे अधिक सोपे होऊ शकते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ