मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:21 IST

BGMI Lite आता BGMI Air: गेमचे नाव बदलले, 1 कोटीहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन, लाँचची तारीख अजून गुलदस्त्यात

Krafton India ने BGMI Lite चे नाव बदलून BGMI Air केले आहे. भारतात 1 कोटीहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केले असून सुरुवातीचे डाऊनलोड सुमारे 1GB असणार आहे.

BGMI Lite आता BGMI Air: गेमचे नाव बदलले, 1 कोटीहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन, लाँचची तारीख अजून गुलदस्त्यात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

BGMI खेळणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आली आहे. हा गेम तयार करणाऱ्या Krafton India कंपनीने आपल्या नव्या BGMI Lite चे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा गेम BGMI Air या नावाने ओळखला जाणार आहे. कंपनीने 15 ऑक्टोबर 2026 रोजी याबाबत घोषणा केली.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात या नव्या गेमसाठी 1 कोटीहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केले आहे. गेमचा ओपन बीटा लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हा गेम प्रत्यक्षात कधी लाँच होणार, याची तारीख कंपनीने अजून जाहीर केलेली नाही.

तुमचा फोन BGMI खेळताना हँग होत असेल, गरम होत असेल किंवा फोनमध्ये स्टोरेज कमी असल्यामुळे तुम्हाला BGMI खेळता येत नसेल, तर Krafton चा हा नवा गेम तुमच्या कामी येऊ शकतो. BGMI चा गेमिंग अनुभव जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत पोहोचावा, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कमी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्सनाही BGMI खेळण्याचा अनुभव मिळावा, म्हणून गेमचे नवीन वर्जन तयार केले जात आहे.

नाव का बदलले, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. Krafton ने हा गेम आधी BGMI Lite या नावाने सादर केला होता. आता कंपनीने त्याचे नाव बदलून BGMI Air असे केले आहे. BGMI चा मुख्य गेमिंग अनुभव हलक्या डाऊनलोडसह जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेणे, हा कंपनीचा उद्देश आहे. नाव बदलले म्हणून गेमचे सगळेच फीचर्स बदलणार नाहीत. सध्या कंपनीने फक्त गेमच्या नव्या नावाची घोषणा केली आहे आणि हलक्या वर्जनसह हा गेम सादर करण्याची योजना आखली आहे. गेमचे सर्व फीचर्स, ग्राफिक्स आणि फोनसाठी लागणारी महत्त्वाची माहिती अजून शेअर करण्यात आलेली नाही.

BGMI Air ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची छोटी डाऊनलोड साईज. सुरुवातीचे डाऊनलोड सुमारे 1GB असणार आहे. ज्यांच्या फोनमध्ये कमी स्टोरेज आहे किंवा ज्यांना खूप मोठे गेम डाऊनलोड करायचे नाहीत, अशा यूजर्ससाठी ही नवी अपडेट फायद्याची ठरणार आहे.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. सुरुवातीचे डाऊनलोड सुमारे 1GB असणार आहे, याचा अर्थ गेम इंस्टॉल केल्यानंतर फोनमध्ये फक्त तितकीच जागा व्यापली जाईल असा नाही. गेमचा इतर डेटा आणि अपडेट्समुळे जास्त स्टोरेज लागू शकते. गेमचे सर्व मोड्स आणि फाईल्स डाऊनलोड केल्यानंतर एकूण किती जागा व्यापली जाईल, याबद्दल कंपनीने अजून स्पष्टपणे माहिती दिलेली नाही.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ