शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीच्या फराळात करा खमंग डिंक-बेसन लाडू, सोपी रेसिपी

दिवाळीच्या फराळात करा खमंग डिंक-बेसन लाडू, सोपी रेसिपी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

दिवाळीसाठी घरी डिंक घालून बेसनाचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत. चवीसोबतच शरीरासाठीही गुणकारी असलेले हे लाडू नाश्त्यात किंवा भूक लागली की खाता येतात.

दिवाळी असो किंवा इतर कुठलाही सण, घरात वेगवेगळे पदार्थ नेहमीच बनवले जातात. गोड पदार्थ बनवण्यासाठी तसं कुठलंही कारण लागत नाही. फराळात शंकरपाळ्या, बेसन लाडू, चिवडा असे ठरलेले पदार्थ दरवर्षी बनतातच. यंदा मात्र डिंक घालून बेसनाचे लाडू करण्याची सोपी पद्धत पाहूया.

या पद्धतीने केलेले डिंक-बेसन लाडू चवीला तर चांगले लागतातच, पण शरीरासाठीही खूप जास्त गुणकारी आहेत. साजूक तुपात खमंग भाजलेले बेसन, सुका मेवा आणि डिंकाची चव या सगळ्यामुळे हे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात.

डिंकाचे लाडू घरातल्या प्रत्येकाला आवडतातच असं नाही. म्हणून बेसन लाडू करताना त्यात थोडा डिंक घातला, तर लाडूची चव आणखीनच खुलते. हा लाडू सकाळच्या नाश्त्यात खाता येतो, तसंच इतर वेळी भूक लागली तरी खाऊ शकता. फराळात नेहमी तेच ठरलेले पदार्थ करण्यापेक्षा काहीतरी वेगळं नक्की करून पाहावं.

साहित्य म्हणून बेसन, डिंक, वेलची पावडर, तूप, सुका मेवा आणि पिठीसाखर लागेल.

कृती अशी: बेसन-डिंक लाडू करण्यासाठी सर्वात आधी कढईत तूप गरम करा आणि त्यात डिंक भाजून घ्या. डिंक फुलला की लगेच बाहेर काढा आणि थंड व्हायला ठेवा.

त्याच कढईत पुन्हा एकदा तूप गरम करा आणि त्यात वाटीभर बेसन मंद आचेवर भाजा. बेसनाचा रंग लालसर होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे.

तळून घेतलेला डिंक थंड झाला की हातानं बारीक करून घ्या. भाजलेलं बेसन ताटात काढा, त्यात पिठीसाखर घाला आणि सगळं एकत्र करा.

त्यानंतर त्यात बारीक केलेला डिंक, बारीक चिरून घेतलेला सुका मेवा आणि वेलची पावडर घालून सगळं नीट मिसळा. मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की आपल्या आवडीनुसार लाडू वळा.

अशा प्रकारे झटपट तयार झाले खमंग डिंक-बेसन लाडू. हे लाडू थंडीच्या दिवसांतही खाऊ शकता.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ