सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 184 | Moderate 13:39 IST

बिग बॉस बांग्लामध्ये राजवीर-नंदिनीची कॅमेऱ्यासमोर जवळीक, सौरव गांगुलींनी सुनावलं

बिग बॉस बांग्लातील दोन स्पर्धकांच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. शोचे होस्ट सौरव गांगुली यांनी दोघांना थेट इशारा दिला.

बिग बॉस बांग्लामध्ये राजवीर-नंदिनीची कॅमेऱ्यासमोर जवळीक, सौरव गांगुलींनी सुनावलं छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

टीव्हीवरचा सगळ्यात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. सध्या देशात हा शो सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये सुरू आहे. सलमान खान यांच्या हिंदी बिग बॉसची चर्चा नेहमीच जास्त असते, पण यावेळी चित्र थोडं उलटं दिसतंय. बांग्ला भाषेतल्या बिग बॉसमधले काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या शोचं होस्टिंग माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली करत आहेत.

नेमकं काय झालं, तर बिग बॉस बांग्लाच्या घरात स्पर्धकांनी मर्यादा ओलांडल्याचं बोललं जात आहे. घरात साधारण 150 ते 200 कॅमेरे लावलेले आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यात शूटिंग सुरू असतं, हे माहीत असूनही दोन स्पर्धक उघडपणे जवळीक साधताना दिसले. हा फॅमिली शो आहे आणि लहान मुलंही तो आवडीने बघतात. तरीही असं वागल्यामुळे सौरव गांगुली यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या स्पर्धकांना थेट वॉर्निंग दिली.

हे स्पर्धक आहेत राजवीर आणि नंदिनी. सध्या त्यांचीच सगळीकडे चर्चा आहे. रिऍलिटी शोमध्ये आपण आहोत आणि तिथे 24 तास कॅमेरे चालू असतात, हे दोघं जवळपास विसरूनच गेले होते, असं दिसतंय. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ते अनेकदा कॅमेऱ्यासमोरच जवळ येताना दिसतात. कधी घट्ट मिठी मारतात, तर कधी लिप लॉक करतात. हे सगळं उघडपणे सुरू होतं. घरातले बाकीचे स्पर्धकही हे बघून अवघडून गेले.

फॅमिली शोमध्ये असला रोमान्स बघून गांगुली यांचा पारा चढला. वीकेंडच्या भागात त्यांनी राजवीर आणि नंदिनीला चांगलंच सुनावलं. ते रागात म्हणाले, "हे काय चाललंय? तुम्ही विसरलात का की तुम्ही कुठे आहात? हा शो पूर्ण फॅमिली बघते, याचं भान ठेवा." गांगुली यांना इतक्या रागात बघून घरातले सगळे स्पर्धक शांत झाले होते.

या क्लिप्स सोशल मीडियावर खूप फिरत आहेत आणि लोक त्यावर कमेंट करत आहेत. काही जण म्हणतात, हा बिग बॉस आहे की आणखी काही? सलमान यांच्या हिंदी बिग बॉसमधला लव्ह कटारिया आणि स्काऊट यांचा रोमान्स यांच्यापुढे काहीच नाही, असंही लोक म्हणत आहेत. बांग्ला बिग बॉसने तर सगळ्या हद्दीच पार केल्या, अशी प्रतिक्रिया येत आहे.

काही नेटकऱ्यांनी शोच्या मेकर्सनाही प्रश्न विचारले आहेत. टीआरपीसाठी तुम्ही असे घाणेरडे टास्क करून घेता का, असं ते विचारतात. फॅमिली शोमध्ये असं दाखवणं चुकीचं आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.

आता गांगुली यांनी वॉर्निंग दिल्यानंतर पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राजवीर आणि नंदिनी सुधारणार का, की त्यांना घराबाहेर काढलं जाणार, हे येणाऱ्या भागांतच कळेल. पण सध्या तरी बिग बॉस बांग्लाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ