गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
4 नोव्ह | 17:10  वाठोड्यातील कचरा वर्गीकरण प्रकल्पात ट्रॉमल मशीनमध्ये अडकून २८ वर्षांच्या कामगाराचा मृत्यू 4 नोव्ह | 15:40  नागपूर जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदायला बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सुधारित आदेश 09:54  नागपूर हिवाळी अधिवेशन: 19 नोव्हेंबरपासून विधान भवनात अधिकाऱ्यांचे येणे सुरू, विभागीय आयुक्त बिदरी यांचे 09:09  समृद्धी महामार्गावर 15 ठिकाणी पोलीस मदत केंद्रे, 420 पदांना मंजुरी, स्वतंत्र नियंत्रण कक्ष 08:57  नागपूरच्या दाभा येथे आंतरराष्ट्रीय कृषी केंद्र, 879.63 कोटींना मंत्रिमंडळाची मंजुरी 08:42  वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळीची भेट, निर्वाह भत्त्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ
सर्व थेट अपडेट

नवी दिल्लीतील रिन्यूएबल एनर्जी समिटमध्ये महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनाला भरभरून प्रतिसाद

व्यवसाय PT24 टीम

भारत मंडपम येथे २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या परिषदेत महाराष्ट्र 'फोकस स्टेट' म्हणून सहभागी झाला आहे.

नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर : भारत मंडपम येथे २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत भरलेल्या 'भारत रिन्यूएबल एनर्जी समिट-२०२६' मध्ये महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनाला भेट देणाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परिषदेत महाराष्ट्र 'फोकस स्टेट' म्हणून सहभागी झाला आहे. ऐतिहासिक गडकिल्ल्यांची ओळख आणि हरित ऊर्जेच्या दिशेने राज्याची सुरू असलेली वाटचाल यांचा संगम या दालनात साधण्यात आला आहे. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी परिषदेत जाहीर केले की, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने गुजरातनंतर देशात दुसरे स्थान मिळविले आहे. ही परिषद विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्या उपस्थितीत झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनातील सादरीकरणाला विशेष महत्त्व आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली या प्रदर्शनातून राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी मांडली जात आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांनी मिळून हे दालन उभारले आहे. प्रमुख योजना, प्रकल्प आणि नवनवीन उपक्रम यांची माहिती तिथे देण्यात आली आहे.

दालनाची उभारणी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

दालनातील 'इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन' हे अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. त्यातून घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्प यांची आभासी सफर अनुभवता येते.

दृकश्राव्य सादरीकरणे आणि संवादात्मक डिजिटल माध्यमांतून चारही वीज कंपन्यांचे काम उलगडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीवर आधारलेली रचना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि माहितीची सोपी मांडणी यामुळे हे दालन लक्ष वेधून घेत आहे. दालनातील 'सेल्फी बूथ'लाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दालनाला भेट देऊन सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले. दालनाची उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी राज्यातील चारही वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

राजस्थान ऊर्जा विकास आयटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शिवप्रसाद नकाते आणि विविध राज्यांच्या ऊर्जा विभागातील वरिष्ठ व्यवस्थापन व अधिकारी यांनीही महाराष्ट्र दालनाला भेट देऊन योजना आणि कार्यपद्धती समजून घेतल्या. महावितरणचे संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, महानिर्मितीचे संचालक अभय हरणे, संचालक (प्रकल्प) राजेश पाटील, कार्यकारी संचालक (सौर) गिरीश कुमारवार, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर हेही दालनात आले होते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील उपक्रमांची माहिती घेतली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले.

#नागपूर#कारोबार#PT24#Business#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ