बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:02 IST

मुलांसाठी घरीच करा कुरकुरीत आणि चटपटीत नाचणीचे चिप्स

विकतच्या पॅकबंद स्नॅक्सऐवजी मुलांना घरी केलेले नाचणीचे चिप्स देता येतात. त्याची सोपी रेसिपी इथे दिली आहे.

मुलांसाठी घरीच करा कुरकुरीत आणि चटपटीत नाचणीचे चिप्स छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

लहान मुलं नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याचा खूप हट्ट करतात. संध्याकाळच्या वेळी चहासोबत घरातल्या सगळ्यांनाच काहीतरी कुरकुरीत आणि खमंग खावंसं वाटतं. अशावेळी चकली किंवा मैद्यापासून बनवलेले अनहेल्दी पॅकबंद स्नॅक्स विकत आणून खाल्ले जातात. पण हे चिप्स मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. म्हणून मुलांना नेहमी विकतचे पदार्थ देण्यापेक्षा घरी नाचणीचे चिप्स करून देता येतील.

बाजारातला तेलकट आणि हवाबंद खाऊ मुलांना देण्याऐवजी घरी केलेले नाचणीचे चिप्स त्यांच्या डब्यात द्यावेत किंवा भूक लागल्यावर खायला द्यावेत. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि लोह असतं. नाचणीत कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असल्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. रोजच्या आहारात नियमितपणे एक नाचणीची भाकरी खावी, असंही सांगितलं आहे. चला तर मग, नाचणीचे चिप्स करण्याची सोपी रेसिपी पाहूया.

साहित्य म्हणजे नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ, गरम पाणी, पांढरे तीळ, ओवा, काश्मिरी लाल तिखट, हळद, साजूक तूप आणि मीठ. चिप्स तयार झाल्यावर वरून भुरभुरायला चाट मसाला, जिरे पावडर, आमचूर पावडर, पेरी-पेरी मसाला आणि काळं मीठ लागेल.

नाचणीचे चिप्स करण्यासाठी सर्वप्रथम टोपात एक ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला एक उकळी आली की त्यात मीठ, तेल, ओवा, तीळ, लाल तिखट आणि हळद घालून नीट मिक्स करा. पाणी गरम झाल्यावर त्यात नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालून सगळं साहित्य चमच्याने एकत्र करा. नंतर गॅस बंद करा, तयार झालेल्या मिश्रणावर झाकण ठेवा आणि पाच मिनिटं तसंच राहू द्या.

वाफेमुळे नाचणीचं पीठ मऊ होईल. मिश्रण थोडं गार झालं की ते ताटात काढून तीन ते चार मिनिटं चांगलं मळून घ्या. मऊ गोळा तयार झाला की तो दोन बटर पेपरच्या मध्ये ठेवून चपातीसारखा मध्यम आकारात लाटा. चिप्स जेवढे पातळ असतील तेवढेच ते कुरकुरीत होतात, हे लक्षात ठेवा.

लाटलेल्या चपातीवर काट्याच्या चमच्याने छोटे छोटे खड्डे पाडा आणि त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात काप घ्या. त्यानंतर कढईत तेल गरम करून हे चिप्स मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.

तळलेले चिप्स वाटीत घ्या आणि त्यावर चाट मसाला, पेरी-पेरी मसाला आणि काळं मीठ घालून चांगलं मिक्स करा. अशा सोप्या पद्धतीने नाचणीचे चिप्स तयार आहेत, जे मुलांना डब्यात देता येतील किंवा भूक लागल्यावर खायला देता येतील.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ