सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:38 IST

फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या 'मिरांडा वॉर्निंग'चा थरारक टीझर प्रदर्शित

'मिरांडा वॉर्निंग' हा आगामी मराठी चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. फार्महाऊसवर झालेल्या खुनाचा शोध घेणाऱ्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा रहस्य आणि थरार पाहायला मिळणार आहे. 'मिरांडा वॉर्निंग' हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. फार्महाऊसवर झालेल्या खुनाचा शोध घेणारी ही गोष्ट आहे आणि त्याचा रंजक टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

या टीझरमधून चित्रपटातील रहस्याची झलक दिसते. कलाकारांची दमदार फळी आणि खुनाच्या तपासाभोवती फिरणारी कथा यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत जान्हवी किल्लेकर, सुरेश विश्वकर्मा, पायल जाधव, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, एकनाथ गीते आणि त्रिशा कमलाकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. फार्महाऊसवर झालेल्या खुनानंतर सुरू होणारा तपास, संशयाची वर्तुळं आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला करावा लागणारा शोध, याची झलक टीझरमध्ये दिसते.

खुनाच्या घटनेनंतर तपासाला सुरुवात होते आणि त्यातून अनेक प्रश्न उभे राहतात. संशयाची दिशा बदलत जाते आणि प्रत्येक नव्या धाग्यासोबत रहस्याचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. शेवटी खरा गुन्हेगार कोण, पोलीस अधिकारी त्याच्यापर्यंत कसा पोहोचणार आणि या प्रकरणामागचं सत्य काय, ही उत्सुकता टीझरमुळे निर्माण झाली आहे.

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांनी २०२३ मध्ये 'गेट-टुगेदर' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

'मिरांडा वॉर्निंग'साठी रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी लेखन केलं आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

सस्पेन्स आणि थ्रिलर यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटातून प्रेक्षकांना खुनाच्या तपासाचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या रहस्यमय कथेतील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २७ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ