बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
11:20  पुणे शिक्षक मतदारसंघात आसगावकर बाद, भाजपपुरस्कृत कौस्तुभ गावडे यांचा मार्ग सुकर 00:00  आरोपीचा पाठलाग करताना पिंपरी-चिंचवडचे हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू 27 ऑक्ट | 18:20  पुणे पदवीधर मतमोजणीत गोंधळ: सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटल्याचा आरोप, हर्षदा देशमुख आक्रमक 12:25  धानोरीच्या गंगा न्यू टाऊनमध्ये काळे, दुर्गंधीयुक्त पाणी; रहिवाशांचे बिल्डरविरोधात आंदोलन 12:55  पुणेकरांना दिलासा: जादा पाणीकपात सध्या नाही, दर गुरुवारी १० टक्के कपात कायम 01:41  पुणे शिक्षक मतदारसंघ: काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर, शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर
सर्व थेट अपडेट

पुण्यातील उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची कथित धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यातील उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची कथित धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

सचिन भोईटे यांच्याशी झालेल्या कथित संभाषणाची क्लिप पसरल्याने खळबळ उडाली आहे; पोलीस सूत्रांनी वेगळीच माहिती दिली आहे.

पुण्यातील वादग्रस्त उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये सूर्यवंशी हे सचिन भोईटे नावाच्या व्यक्तीला दमबाजी करत असल्याचे सांगितले जात आहे. क्लिप मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

क्लिपमध्ये सूर्यवंशी आणि भोईटे यांच्यातील संभाषण आहे. त्यात सूर्यवंशी हे नवनाथ नावाच्या व्यक्तीबद्दल बोलताना शिवीगाळ करत असल्याचेही दिसत आहे. "माझा फोन रेकॉर्ड कर" असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केल्याचे सांगितले जाते. ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

संभाषणाच्या सुरुवातीला सूर्यवंशी म्हणतात, "त्या नवनाथला सांग तुझ्या आयच्या XXX. काय करायचं ते कर. मंत्र्याकडे जा, नाही तर कुणाकडे जा. इथून पुढे मी करेन सगळं." त्यावर भोईटे म्हणतात, "मी काय रानातच आहे." सूर्यवंशी पुढे म्हणतात, "तुला काय उपटायचं ते उपट. पहिल्या दिवसापासून सांगितलं मध्ये पडू नको." भोईटे विचारतात, "मी काय केलं?"

यानंतर सूर्यवंशी म्हणतात, "तुझ्या भावाला आणि तुला लयच पडलंय केसचं आयXX." भोईटे यावर उत्तर देतात, "पण आम्ही काहीच केलं नाही. आम्ही घरीच आहोत सगळे. आम्ही कुठे गेलो नाही? आम्ही घरीच आहोत." सूर्यवंशी विचारतात, "तुम्ही घेतली होती ना जबाबदारी? तो परत काही बोलणार नाही, काही नाही म्हणाला होता ना?" भोईटे म्हणतात, "हो, पण आठ दिवस म्हटलं होतं... पण ते काय करणार ते आम्हालाच विचारूनच करणार का?"

सूर्यवंशी म्हणतात, "तुला विचारून करणार नाही तर मग कशाला जबाबदारी घेतो तू?" भोईटे सांगतात, "अहो दादा, आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्ही काय करणार सांगा बरं?" त्यावर सूर्यवंशी म्हणतात, "सामान्य तर सामान्यच राहायचं ना? कशाला पडायचं या गोष्टीमध्ये? दादा जाऊ द्या... हे करा अन् ते करा... हे करणार नाही, ते करणार नाही..."

भोईटे म्हणतात, "परत कोणी काही म्हटलं नाही. आमचा भाऊ आणि आम्ही काही गेलो नाही कुठं?" सूर्यवंशी म्हणतात, "निरोप दे त्यांना फोन करून." भोईटे उत्तर देतात, "त्यांना कसं सांगणार आता? तुमचं तुम्ही बघा आता." सूर्यवंशी विचारतात, "सर्व गोष्टी मला सांगत होता ना?" भोईटे म्हणतात, "तुमचं आणि माझे चांगले संबंध होते म्हणून बोलायचो. या प्रकरणाशी माझा तरी काय संबंध आहे? बरोबर आहे की नाही दादा?"

शेवटी सूर्यवंशी म्हणतात, "त्याला लय दात आलेत ना? XXX" आणि भोईटे विचारतात, "झालं काय? मला सांगाल की नाही तुम्ही?"

दरम्यान, राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवर हल्ला केल्याचा बनाव रचल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ