सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 07:48 IST

बारामतीतील राणा सूर्यवंशींवरील हल्ला त्यांनीच घडवल्याचे उघड; तिघांची चौकशी सुरू

व्हीव्हीआयपींसारखे पोलीस संरक्षण मिळावे म्हणून उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

बारामतीतील राणा सूर्यवंशींवरील हल्ला त्यांनीच घडवल्याचे उघड; तिघांची चौकशी सुरू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बारामतीत उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. हा हल्ला त्यांनी स्वतःच रचला होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. व्हीव्हीआयपींना मिळते तसे पोलीस संरक्षण आपल्यालाही मिळावे, यासाठी हा सगळा प्रकार घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे यांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांकडे सध्या चौकशी सुरू आहे. बारामती पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मीकांत महादेव सुर्यवंशी (वय ४२, रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी या हल्ल्याची तक्रार दिली आहे. लक्ष्मीकांत हे राणा सुर्यवंशी यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करत होते.

रविवारी, १८ तारखेला सायंकाळी राणा सुर्यवंशी वैयक्तिक कामासाठी बारामती तालुक्यातील गोजुबावी भागात गेले होते. तेव्हा स्कूटीवरून आलेल्या अज्ञात लोकांनी शस्त्राने त्यांच्या उजव्या हातावर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती आणि हल्ल्यामागे नेमके काय कारण असावे, याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात होते.

चालकाने दिलेल्या तक्रारीत राणा यांनी पूर्वी ज्या संस्थेत काम केले होते, तिच्या चालकांवर संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांपैकी एका अल्पवयीन मुलासह दोघांना पकडले आणि प्राथमिक तपासातच या हल्ल्याबद्दल संशय निर्माण झाला. पुढे या दोघांचा करविता दुसराच कोणी तिसरा असल्याचे दिसून आले. शुक्रवारी पोलिसांनी त्या तिसऱ्या आरोपीलाही अटक केली. त्यानंतर हा हल्ला आधीच ठरवून केलेला होता आणि तो खुद्द राणा यांनीच घडवून आणला, असे समोर आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

राणा सुर्यवंशी हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांनी पोलिसांची पेड सुरक्षा घेतलेली आहे आणि त्यासाठी त्यांना पैसे भरावे लागतात. पण मंत्र्यांना किंवा एखाद्या व्हीव्हीआयपीला जसा कॅन्व्हाय किंवा एस्कॉर्ट असतो, तशी सुरक्षा आपल्याला असावी, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. अशी सुरक्षा अतिसंवेदनशील व्यक्ती आणि मंत्र्यांना दिली जाते आणि त्यासाठी एक नियमावली आहे. एखाद्याच्या जीवावर हल्ला होण्याची शक्यता असेल किंवा हल्ला झालेला असेल, तर त्याची माहिती भरून ही सुरक्षा मिळवता येते. म्हणूनच हा हल्ला घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ