गणेश विसर्जनासाठी मनपा आणि पोलिस प्रशासन सज्ज
नागपूर.
शहरातील गणेश विसर्जन सुरळीत, सुरक्षित आणि शांततेत पार पडावे यासाठी मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या विविध व्यवस्थांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील आणि मनपा आयुक्त डॉ. विपिन यांनी विसर्जन मार्ग, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता तसेच विसर्जनस्थळांवरील सुविधांचा आढावा घेतला.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि विसर्जन प्रक्रिया सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त श्रीमती अन्नपूर्णा सिंग, मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड यांच्यासह पोलीस, मनपा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या या पाहणीमुळे गणेश विसर्जनासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.
#GanpatiVisarjan #GanapatiBappa #Nagpur #NagpurPolice #NMC #NagpurCity #Ganeshotsav #Visarjan #PrimeTime24
This story has published but the live thread has not started. Updates appear here the moment the desk files one.