मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
23:52 IST

येमेनमध्ये हुथींच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ५३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती

इराणसमर्थित हुथी बंडखोरांनी येमेनी सरकारी दलांच्या लष्करी तळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली; किमान ५३ सैनिक मरण पावल्याची माहिती समोर आली आहे.

येमेनमध्ये हुथींच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ५३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. येमेनमध्ये हुथी बंडखोरांनी केलेल्या भीषण हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. इराणसमर्थित हुथी बंडखोरांनी येमेनी सरकारी दलांच्या लष्करी तळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात किमान ५३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हुथींनी सरकारी सैन्याच्या तळावर अचानक बॅलेस्टिक मिसाईलचा मारा केला, असे या हल्ल्याची पुष्टी करताना सांगण्यात आले. या हल्ल्यामुळे तळावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सैनिकांना सावरण्याची संधी मिळण्याआधीच मिसाईल्स तळावर आदळल्याने मोठी जीवितहानी झाली. किमान ५३ सैनिक मरण पावल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे आणि सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

हुथी आता पूर्वीसारखे फक्त बंदुकीने आणि लहान रॉकेट लॉंचरने हल्ले करणारे राहिलेले नाहीत. ते तांत्रिकदृष्ट्या इतके सक्षम झाले आहेत की त्यांनी सोडलेल्या जवळपास सगळ्याच मिसाईल्स योग्य टार्गेटवर लागतात, असे सांगितले जाते. अमेरिका, इस्रायल आणि सौदीचे सरकार यांना ते आपले कट्टर दुश्मन मानतात, त्यामुळे ते दिवसेंदिवस आपली ताकद आणि क्षमता वाढवत आहेत. हुथींच्या भागात मोठे डोंगर आणि मोठी पठारे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी लढाई सरळ सोपी नाही.

सौदी आणि येमेनमधील हुथींचा संघर्ष खूप जुना आहे. येमेनमध्ये हुथींचा प्रभाव वाढला तर सौदी अरेबियाला ते परवडणारे नाही, म्हणून त्यांनी येमेन सरकारला हुथींविरुद्ध लढायला मदत करायला सुरुवात केली. त्यावर इराणनेही लगेच हुथींना मदत करायला सुरुवात केली. या दोन्ही देशांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष आणखी वाढला. मधल्या काळात हा संघर्ष थांबला होता.

इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या अंत्यसंस्काराला हुथींचे काही प्रमुख गेले होते. तिथून परत येताना सना एअरपोर्टवर सौदीने त्यांच्या विमानावर हल्ला केला. त्या हल्ल्यात हुथींचे सगळेच नेते वाचले, तेव्हा हुथी रागाने पेटले आणि संघर्ष पुन्हा सुरू झाला. आतापर्यंतच्या माहितीनुसार या संघर्षात जास्त नुकसान येमेन सरकारचे आणि सौदीचे झाल्याचे समोर येत आहे.

हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा असल्याने येमेनमधील संघर्षाला व्यापक प्रादेशिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्यपूर्वेत इराणशी संबंधित विविध सशस्त्र गटांच्या हालचालींमुळे परिस्थिती आधीच तणावपूर्ण आहे, त्यात येमेनमधील हिंसाचाराची भर पडली आहे. या संघर्षाचा परिणाम फक्त येमेनपुरता मर्यादित न राहता संपूर्ण आखाती प्रदेशाच्या सुरक्षेवर होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ