रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:55 IST

गोव्यात छापा टाकून वसई पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजीची आंतरराज्य टोळी पकडली

क्रिकेट, फुटबॉल आणि ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सट्टा चालवणाऱ्या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ ने पर्दाफाश केला; आतापर्यंत ९ आरोपींना पकडण्यात आले आहे.

गोव्यात छापा टाकून वसई पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजीची आंतरराज्य टोळी पकडली छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

क्रिकेट, फुटबॉल आणि ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बेकायदेशीर सट्टेबाजी चालवणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा वसईच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ ने पर्दाफाश केला आहे. या टोळीवर सर्वसामान्य लोकांच्या बँक खात्यांचा अपहार केल्याचा आरोप आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२६ च्या फायनल सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या या रॅकेटवर थेट गोव्यात कारवाई करण्यात आली. आतापर्यंत ९ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी जवळपास १० लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, लॅपटॉप, ६३ मोबाईल आणि डझनभर बँक खात्यांशी संबंधित साहित्य जप्त केले आहे.

सुरुवात नायगाव पूर्व येथून झाली. तेथील सनटेक हिल वहा-१ या सोसायटीतल्या एका फ्लॅटमधून ऑनलाईन बेटिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली आणि मुख्य आरोपी फुरकान अहमद जसीमुद्दीन अन्सारी (वय २१) याला ताब्यात घेतले. तपासात समोर आले की, आरोपी 'रेडी बुक' आणि 'रेडी ६६' या पॅनलच्या मदतीने क्रिकेट, रमी आणि फुटबॉलवर सट्टा चालवत होते.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोकांची दिशाभूल करून त्यांच्या नावावर सिमकार्ड आणि बँक खाती उघडण्यात आली होती. ही खाती आर्थिक व्यवहारांसाठी 'म्युल अकाउंट' म्हणून वापरली जात होती. त्या फ्लॅटमधून पोलिसांनी ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पुढच्या तपासात पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांचा माग काढला. अंतिम सामन्यादरम्यान ऑनलाईन बुक पॅनलवरून थेट बेटिंग सुरू असतानाच पोलिसांनी उत्तर गोव्यातील पोरवोरीम येथे छापा टाकला. तेथे नितीन माखिजानी (वय ४५), करण तनवानी (वय २१), दीपक बत्रा (वय २६), हृतिक खूबचंदानी (वय २६), राकेश वाधवानी (वय ३०) आणि मोहित पोपटानी (वय २४) या सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गोंडूराम बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते आणि संतोष घाडगे यांच्यासह सफौज मुकेश पवार, रवींद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, पोहवा सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, राहुल कर्पे, पोलीस अंमलदार अनिल साबळे, पोलीस शिपाई अक्षय बांगर, मसुब आकाश जाधव, मसुब मंगेश भगत आणि सफौज संतोष चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ