दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

वडूजमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काढलेले शंभरहून अधिक जुने मीटर कॅनॉलजवळ फेकले

वडूजमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काढलेले शंभरहून अधिक जुने मीटर कॅनॉलजवळ फेकले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

वडूज येथील दहिवडी रस्त्यावरील वस्तीत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काढलेले जुने वीज मीटर कॅनॉलजवळच्या माळरानावर फेकल्याचे समोर आले. खासगी कंपनीवर कारवाईची मागणी होत आहे.

खटाव तालुक्यातील वडूज शहरात स्मार्ट मीटर योजनेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नागरी वस्तीतील वीज ग्राहकांचे जुने मीटर काढल्यानंतर ते कॅनॉलच्या ठिकाणी माळरानावर फेकून देण्यात आले. ही माहिती संबंधित कंपनीच्या एका जबाबदार व्यक्तीला दिल्यानंतरही कोणीच लक्ष दिले नाही, म्हणून अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्मार्ट मीटर बसवा आणि जुना मीटर कॅनॉलवर मिळवा, अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महावितरण वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवून घेण्यास सांगत आहे. अनेक ग्राहकांनी ते बसवलेही आहेत. हे मीटर बसवण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीला देण्यात आली असून, तिचे कामगार अनेक ठिकाणी हे काम करत आहेत. काही संघटनांनी याला विरोध केला असला, तरी स्मार्ट मीटर बसवणे अनिवार्य असल्याचे सांगितले जात आहे. वडूजमध्ये दहिवडी रस्त्यावरील एका वस्तीतील काही ग्राहकांचे मीटर काढून तिथे स्मार्ट मीटर जोडण्यात आले.

बदललेले जुने मीटर संबंधित खासगी कंपनीने महावितरणच्या कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. मात्र तसे न करता अंदाजे शंभरहून अधिक मीटर या रस्त्यावरील कॅनॉलच्या कडेला फेकून दिल्याचे उघड झाले. काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ही बाब महावितरणचे वरिष्ठ अधिकारी मस्के यांच्या निदर्शनास आणली. त्यावर हा विषय वडूज कार्यालयाच्या अखत्यारीत येतो, तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगून त्यांनी टोलवाटोलवी केली. त्यानंतर अधिकारी दिवटे यांना याबाबत सांगण्यात आले. वडूज कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत फक्त एका वायरमनला पाहणीसाठी पाठवले.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते दिगंबर शिंगाडे तिथे गेले. त्यांनी महावितरणचे दीडवाघ यांना प्रकार सांगून त्याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. दीडवाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याला जाब विचारला. मात्र त्या अधिकाऱ्याने उद्धट पवित्रा घेत आपल्याला यातील काहीच माहिती नसल्याचे दाखवले.

हा प्रकार महावितरणच्या उच्च वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचूनही त्या कर्मचाऱ्याच्या वागण्यात काही फरक पडला नाही. त्यामुळे खासगी कंपनीचा हा कर्मचारी आणि महावितरणचे स्थानिक अधिकारी यांच्यात काही संगनमत आहे की काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. फेकलेले मीटर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी गोळा करून नेले आहेत. आता या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

या प्रकाराबाबत खासगी कंपनीचा खटाव तालुक्याची जबाबदारी असलेला शुभम गुरव याच्याशी संपर्क साधण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही घटना गंभीर असल्याचे सांगून त्याला सविस्तर माहितीही दिली. तरीही गुरव याने स्वतःची जबाबदारी झटकून हे प्रकरण एका सामान्य कर्मचाऱ्यावर ढकलले आणि आपला याच्याशी काही संबंधच नाही, असे दाखवले. त्यामुळे तालुक्याची जबाबदारी असलेल्या शुभम गुरववर कारवाई करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. कारवाई न झाल्यास लवकरच महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ