दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
14:30  मांजरसुंबा घाटात प्रोपिलीन टँकरला अपघात; वायूगळतीचा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी घेतले तज्ज्ञांचे मार्गदर्शन 11:50  आष्टीत वाघाच्या हल्ल्यात देवळालीचे शेतकरी देविदास टकले ठार 19:27  मुख्यमंत्री फडणवीस यांचा लोहारी सावंगात शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम 19:10  दिवाळीच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; उमरेडजवळ 2.6 तीव्रतेची नोंद 17:42  वर्ध्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा, १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत ५ हजार रुपये जमा 17:38  गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांत १११ कोटींहून अधिक रक्कम जमा, अग्रीम, पीएम किसान आणि कर्जमुक्तीचा
सर्व थेट अपडेट

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीची राज्यभरात 'काळी दिवाळी', चटणी-भाकर खाऊन निषेध

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीची राज्यभरात 'काळी दिवाळी', चटणी-भाकर खाऊन निषेध छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

शेतकऱ्यांना सरकारकडून अपुरी मदत मिळते, असं सांगत वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला आणि सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केलं.

एकीकडे दिवाळीचा उत्साह आणि रोषणाई सुरू आहे, तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळते, असं सांगत वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात 'काळी दिवाळी' आंदोलन सुरू केलं आहे.

या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन आणि काळी दिवाळी साजरी करून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. त्यावेळी 'देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी' अशा घोषणाही देण्यात आल्या. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणं हा आंदोलनाचा उद्देश होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन झालं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध केला. शेतकरी आणि शेतमजुरांच्या अडचणींकडे सरकारने गांभीर्याने बघावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

जालन्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी एकत्र आले आणि त्यांनी काळ्या दिवाळीच्या आंदोलनाला सुरुवात केली. बुलढाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.

अकोल्यातील आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तिथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोलापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, म्हणून सरकारने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

पक्षाच्या मागण्या वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पिकांच्या नुकसानीची भरपाई करावी आणि शेतकरी व शेतमजुरांसाठी विशेष मदत जाहीर करावी, अशा या प्रमुख मागण्या आहेत. दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून पक्षाने राज्यभर आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ