जमिनी देऊ नका, एकत्र राहा: पाली सायडोंगरच्या गावकऱ्यांना सयाजी शिंदे यांचे आवाहन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कर्जतमधील पाली सायडोंगर येथे हायड्रॉलिक प्रकल्पासाठी जमिनी देऊ नका, असे अभिनेते सयाजी शिंदे यांनी ग्रामस्थांना सांगितले.
कर्जतमधील पाली सायडोंगर येथे होत असलेल्या हायड्रॉलिक प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊ नयेत, असे आवाहन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी केले. "आपण सगळे एकत्र राहू, बाकी आम्ही बघतो," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाली सायडोंगर येथील शिव मंदिरात स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले.
टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या जंगलतोडीच्या विरोधात सयाजी शिंदे गेल्या सहा महिन्यांपासून खेद व्यक्त करत आहेत. जिथे जंगलतोड सुरू आहे, त्या पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सायडोंगर येथे ते आज आले. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसवर्धन समितीने त्यांचे स्वागत केले. शिंदे यांच्यासोबत कर्जत पर्यावरण बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे, सह्याद्री बचाव समितीचे महेश भारती, तसेच माजी नगराध्यक्ष राजेश लाड उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने हजर होते.
ग्रामस्थांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना शिंदे यांनी आपल्या गावाकडची आठवण सांगितली आणि जमिनी देऊ नका, असे सांगितले. आपणही प्रकल्पग्रस्त आहोत, असे ते म्हणाले. 40 वर्षांपूर्वी त्यांची जमीन धरणासाठी घेतली गेली आणि त्यानंतर 30 वर्षे ते बदली जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जमीन कागदावर दिली गेली, पण प्रत्यक्षात अजूनही मिळालेली नाही. म्हणूनच लहानशा तुकड्यासाठी आपल्या जीवाचा तुकडा देऊ नका, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले.
आता तुम्हाला 20 लाख मिळतील, पण तुमची जमीन कोट्यवधींची आहे, असे शिंदे म्हणाले. जमीन आपली आई आहे, मग आपण आपल्या आईला विकणार का, असा सवालही त्यांनी केला. आम्ही धरणाला जागा देऊन थकलो आहोत, आता तुम्हाला सावध करायला आलो आहे, असे ते म्हणाले. तुम्ही जमिनी देऊ नका, हा प्रकल्प येथून कसा पिटाळून लावायचा ते आम्ही बघतो, असे सूचित करत त्यांनी "मी तुमच्यासोबत आहे," असे आश्वासन दिले.
शिव मंदिरात पर्यावरणप्रेमी रोहिदास लोभी हे स्वच्छतेचे दूत गाडगेबाबा यांच्या वेशात आले होते. जमिनी विकू नका, असे सांगत त्यांनी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" यांसारखी अनेक उदाहरणे भारुड सादर करून दिली. प्रकल्प येथून हटवण्याचा आपला संकल्पही त्यांनी भारुडातून बोलून दाखवला. या भारुडाच्या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांनी टाळ्यांची साथ देत सहभाग घेतला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.