कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायली CA अवंतिका भट्ट; यूट्यूबर साैरव जोशीचा व्हिडिओ व्हायरल, यूजर्सची टीका
यूट्यूबर साैरव जोशी याच्या नव्या व्हिडिओत त्याची पत्नी अवंतिका भट्ट हिने खेळातील डेअरमुळे कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायले. यावरून सोशल मीडियावर यूजर्स नाराज झाले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
प्रसिद्ध यूट्यूबर साैरव जोशी याने अलीकडेच आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक नवा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओत त्याची पत्नी अवंतिका भट्ट हिला कुत्र्याच्या भांड्यात पाणी प्यायला दिल्याचे दिसते आणि तिने ते पाणी त्या भांड्यातून प्यायलेही. एका मजेदार खेळादरम्यान अवंतिकाला मिळालेल्या डेअरमुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या व्हिडिओत कुटुंबातील काही सदस्य एक खेळ खेळताना दिसतात. सगळे जण वर्तुळ करून जमिनीवर बसतात. बाटली फिरवली जाते आणि बाटलीचे तोंड ज्याच्याकडे थांबते, त्याला इतर जण एक डेअर देतात. एका फेरीत बाटली अवंतिकाच्या दिशेने जाऊन थांबते आणि तिला डेअर दिला जातो.
या डेअरमध्ये पती साैरव तिला आपला पाळीव कुत्रा ओरिओ याच्या भांड्यातून पाणी प्यायला सांगतो. सुरुवातीला अवंतिका थोडा संकोच व्यक्त करते. पण काही वेळातच ती हा डेअर पूर्ण करायला तयार होते. त्यानंतर ती कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पिताना दिसते.
साैरव आणि अवंतिका यांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला आहे. अवंतिका व्यवसायाने CA असल्याची माहिती आहे. इतक्या मोठ्या पदावर असलेली अवंतिका यूट्यूब कंटेंटसाठी कुत्र्याच्या जेवणाच्या भांड्यातून पाणी पिते आहे, किंवा पती साैरव तिला असे करायला सांगतो आहे, यावरून यूजर्सच्या भावना दुखावल्या आहेत. लोकांनी यावर आक्षेप नोंदवला असून एवढे शिक्षण घेतल्यानंतर कंटेंटसाठी असे प्रकार करणे यूजर्सना पटलेले नाही. अवंतिकाच्या शिक्षणाची आणि व्यवसायाची माहिती समोर आल्यानंतर या व्हिडिओची चर्चा आणखी वाढली.
हा व्हिडिओ पाहून यूजर्स चांगलेच भडकले आहेत आणि साैरव जोशीवर पुन्हा एकदा टीका होत आहे. पत्नीला अशी वागणूक देणे चुकीचे आहे आणि त्याने हे फक्त कंटेंटसाठी केले, असे यूजर्सचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ साैरव जोशीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलसह अनेक सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.
अनेक यूजर्सनी व्हिडिओवर कमेंट्स करून या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले, "हे लोक कंटेंटसाठी कितीही खालच्या पातळीला जाऊ शकतात". दुसऱ्या यूजरने लिहिले, "हे फारच वाईट आहे". आणखी एका यूजरने लिहिले, "याने फक्त कंटेंटसाठी बायको ठेवली आहे".
या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर झालेल्या पोस्ट आणि व्हिडिओवर आधारित आहे.