मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:01 IST

व्हायरल व्हिडीओ: भुकेल्या पिल्लासाठी हत्तीणीने हलवलं अख्खं झाड

पिल्लाला फळं खाता येत नव्हती म्हणून आईने झाडालाच जोरात धडक दिली आणि फळांचा सडाच पडला, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ: भुकेल्या पिल्लासाठी हत्तीणीने हलवलं अख्खं झाड
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

आईचं प्रेम हे कुठल्याही जातीच्या, प्रजातीच्या सीमेत बांधलेलं नसतं, हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय. माणूस असो, पक्षी असो की प्राणी, पिल्लासाठी आई जीवाची पर्वा न करता काहीही करायला तयार असते, याचंच उदाहरण या व्हिडीओत बघायला मिळतं.

व्हिडीओत एक छोटं हत्तीचं पिल्लू दिसतं, ज्याला जोरात भूक लागलेली असते. समोर झाडावर भरपूर फळं लटकलेली असतात, पण पिल्लू लहान असल्यामुळे त्याची सोंड तिथपर्यंत पोचतच नाही. ते फक्त वर बघत राहतं, हतबल होऊन. हे सगळं त्याची आई बाजूला उभी राहून बघत असते. पिल्लाला काय हवंय हे तिला लगेच कळतं. ती सुद्धा एकदा वर बघते, पण तिचीही सोंड फळांपर्यंत पोचत नाही, कारण फळं खूप उंचावर असतात.

मग आई हत्तीण मागे सरकते आणि पूर्ण ताकद लावून झाडाला जोरदार धडक देते. एकदा नाही, तर पुन्हा पुन्हा ती झाड हलवत राहते. अखेर चमत्कार घडल्यासारखं झाडावरची सगळी फळं खाली कोसळायला लागतात, जणू फळांचा पाऊसच पडतो. फळं खाली पडताच पिल्लू आनंदाने बागडायला लागतं आणि पटापट फळं खायला सुरुवात करतं. त्या क्षणी पिल्लाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद बघण्यासारखा असतो.

व्हिडीओ बारकाईने पाहिला तर लक्षात येतं की, हत्तीणीने धडक दिल्यावर झाडाचं खोड थोडं झिजलेलं दिसतं. यावरून ती किती जोरात धडकली असेल याचा अंदाज येतो. हत्तीच्या अंगात प्रचंड ताकद असली तरी अशी धडक दिल्यावर तिलाही नक्कीच लागलं असेल. पण पिल्लाच्या भुकेपुढे तिने स्वतःच्या दुखण्याचा विचारही केला नाही.

coreculture.inn या पेजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून आतापर्यंत तो १७ लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, आई कोणत्याही जातीची असो, तिचं प्रेम सारखंच असतं. दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, म्हणूनच मला हत्ती सगळ्यात जास्त आवडतो. तर आणखी एका युजरने टिप्पणी केली की, जंगल नष्ट करून प्राण्यांचं घर आणि त्यांचं खाणं माणसांनीच हिसकावून घेतलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठे शूट झाला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ AI ने तयार केला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे व्हिडीओ खरा आहे की AI निर्मित, याची निश्चित पडताळणी होऊ शकलेली नाही.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ