मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:48 IST

बाईक की मिनी बस? एकाच बाईकवर डझनभर मुलं बसवून वृद्ध बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास, Video Viral

एका बाईकवर सहा-सात मुलांना बसवून प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यूजर्सनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

रस्त्यावर वाहन चालवताना काही ठराविक नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. Motor Vehicles Act, 1988 च्या कलम 128 नुसार, बाईकस्वार स्वतःसोबत फक्त आणखी एका प्रवाशाला गाडीवर बसवू शकतो. म्हणजेच एका बाईकवर चालकासह जास्तीत जास्त दोनच जणांना बसण्याची कायद्याने परवानगी आहे. पण हा नियम अनेकजण पाळत नाहीत. कधी तीन तर कधी चार जण एका बाईकवर बसून प्रवास करताना दिसतात. मात्र अलिकडे सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका व्हिडिओत याहून भयंकर दृष्य दिसलं. यात तीन-चार नव्हे, तर तब्बल डझनभर मुलं एकाच बाईकवर बसून प्रवास करताना दिसली. एक बाईकस्वार आणि त्याच्या मागे मुलांचा मोठा ग्रुप कसाबसा एडजस्ट होऊन बसलेला दिसतो. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हा व्हिडिओ एका व्यक्तीने स्वतःच्या कारमधून शूट केला. रस्त्यावरुन जाताना त्याला कारसमोरुन एक भरगच्च भरलेली बाईक जाताना दिसली. बाईकवरचं दृष्य इतकं अजब होतं की त्याची नजर तिथून हलली नाही. त्याने लगेच हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि सोशल मीडियावर शेअर केलं. व्हिडिओत एका बाईकवर वृद्ध बाईकस्वार आणि त्याच्या मागे तसंच पुढे पेट्रोलच्या टाकीवर जवळपास सहा-सात लहान मुलं कसेबसे बसलेली दिसतात. यातील काही मुलं बाईकच्या साईडला असलेल्या फुटरेस्टवर उभं राहून लटकत प्रवास करत होती. मुलांच्या हातात शाळेच्या बॅगाही लटकलेल्या दिसत होत्या, म्हणजे ही मुलं शाळेतून येताना किंवा शाळेला जाताना या बाईकवरुन प्रवास करत असल्याचं दिसून येतं. या दृष्यांनी अनेकांना धक्का दिला. इतक्या जणांनी एका बाईकवर प्रवास करणं जीवघेणं ठरु शकतं, कारण यातील एकाचाही हात निसटला असता तर अपघात होऊन मुलांना दुखापत होण्याची शक्यता होती.

हा व्हिडिओ arshad_khan_886906 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्सनी यावर आपली मतं मांडली आहेत. एका यूजरने लिहिलं की, एका बाईकवर एवढ्या मुलांना बसवणं म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करणं आहे. दुसऱ्या यूजरने लिहिलं, बापरे इतके जण तर कारमध्येही बसवले जात नाहीत. तर आणखी एका यूजरने लिहिलं, मुलांच्या सुरक्षेचा विचार तरी करायला हवा होता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ