संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवण्यासाठी बाप्पाच्या मराठी शुभेच्छा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रियजनांना पाठवता येतील अशा गणरायाच्या मराठमोळ्या शुभेच्छा.
हिंदू पंचांगानुसार दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते. हा दिवस विघ्नहर्ता श्रीगणेशाला समर्पित केलेला असतो. या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते आणि बाप्पाला गोड पदार्थांचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
या व्रतामुळे घरातील विघ्न, संकट, रोग आणि आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते, अशी मान्यता आहे. हे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात. दिवसभर उपवास करून संध्याकाळी बाप्पाला महानैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यानंतरच उपवास सोडला जातो.
आपला दिवस जसा आनंदाचा आणि भक्तीचा जावा असे वाटते, तसाच इतरांचाही जावा, म्हणून नातेवाईकांना आणि प्रियजनांना संकष्टी चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की पाठवा. त्यासाठी हे काही संदेश.
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो, नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना... संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते, आणि आपली कामाची सुरुवात श्री गणेशापासून होते. गणपती बाप्पा मोरया, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर, अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना!
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी, मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
ओम गं गणपतये नमो नमः, श्री सिद्धीविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
भक्ति गणपती, शक्ति गणपती, सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती, महागणपती. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
संकट कोणतेही असो, ते तारण्यासाठी कायम असतोस तू... विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत. गणपती बाप्पा मोरया, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
दुर्वांची जुडी, मोदकाचा प्रसाद, बाप्पा तुमच्यावर सदैव करो आशीर्वादाचा वर्षाव! संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा॥ श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळो. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.