मलबार हिलच्या प्रियदर्शिनी पार्कमध्ये ३० ऑक्टोबरपासून 'स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६'
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईतील प्रियदर्शिनी पार्कमध्ये ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या काळात तीन दिवसांचा महोत्सव होणार आहे. ११० हून अधिक स्टॉल्स आणि २० हून अधिक मोफत कार्यशाळा असतील.
मुंबईतील मलबार हिल येथील प्रियदर्शिनी पार्कमध्ये 'स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६' हा तीन दिवसांचा मोठा महोत्सव भरणार आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबर ते रविवार, १ नोव्हेंबर २०२६ या काळात तो सुरू राहील. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि महोत्सवाच्या आयोजक ॲड. सुशिबेन शाह यांनी ही माहिती दिली. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, महाराष्ट्रासह देशभरातील उद्योजकांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ देणे आणि महिला बचत गट तसेच व्यावसायिकांना उभारी देणे, हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच दिवाळीच्या निमित्ताने देशातील उद्योजकांना आणि बचत गटांना ग्राहकांसमोर आपला माल मांडता येईल.
उद्घाटन सोहळा शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यसभेचे खासदार मा. श्री. मिलिंद देवरा या वेळी उपस्थित राहतील. नेत्या सौ. मीनाताई कांबळी, सौ. सीमा सिंह यांच्यासह इतर मान्यवरही सोहळ्याला येणार आहेत.
ॲड. शाह यांच्या म्हणण्यानुसार, महोत्सवात ११० हून अधिक स्टॉल्स असतील. त्यांतून स्वदेशी उत्पादने, हस्तकला, स्थानिक उद्योजकांचा माल आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरेल आणि त्यांची विक्रीही होईल. नागरिकांसाठी २० हून अधिक मोफत कार्यशाळा ठेवल्या आहेत. पपेट शो हे महोत्सवाचे खास आकर्षण असेल.
स्थानिक उत्पादक, लघुउद्योजक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी मिळावी, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी आणि नागरिकांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, हा यामागचा मुख्य हेतू आहे. दिवाळीच्या खरेदीतून देशातील उत्पादनांना आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावे, असा संदेश महोत्सवातून दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या महोत्सवात सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. सण-उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपावी आणि गरजूंना मदतीचा हात द्यावा, हा त्यामागचा हेतू आहे. आनंदोत्सवाबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याचा संदेश यातून दिला जाईल, असेही ॲड. सुशिबेन शाह यांनी सांगितले.
मुंबईकरांनी या तीन दिवसांच्या 'स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६' ला भेट द्यावी, स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी, स्थानिक उद्योजक आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी होणाऱ्या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. सुशिबेन शाह यांनी केले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.