समसप्तक योग: सूर्य-शनीच्या स्थितीमुळे मेष, तूळ, मीन राशींना ३० दिवस जपून राहावं लागणार
सूर्याने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे शनीसोबत समसप्तक योग तयार झालाय, त्यामुळे तीन राशींनी करिअर आणि तब्येतीची विशेष काळजी घ्यायला हवी.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानतात आणि शनीला कर्म व न्यायाचा कारक मानतात. हे दोघं बाप-लेक असले तरी स्वभावानं एकदम वेगळे, त्यामुळे त्यांना एकमेकांचे शत्रू ग्रह समजलं जातं. कुंडलीत किंवा ग्रहांच्या फिरण्यामुळे जेव्हा या दोघांची विशिष्ट स्थिती जुळून येते, तेव्हा त्याचा परिणाम काही ठराविक राशींच्या आयुष्यावर दिसतो. १७ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत गेला आणि त्यामुळे सूर्य-शनीचा समसप्तक योग तयार झालाय. या योगात हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या घरात येऊन बसलेत. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तीन राशींना काम, तब्येत, पैसा आणि नात्यांच्या बाबतीत जपून राहावं लागणार आहे.
मेष राशीच्या कुंडलीत सूर्य सहाव्या घरात असेल तर शनी बाराव्या घरात. या दोन ग्रहांच्या विरुद्ध स्थितीमुळे ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. सहकाऱ्यांशी खटके उडण्याची शक्यता असल्यानं त्याचा परिणाम कामाच्या स्पीडवर होऊ शकतो. जे कोणी पार्टनरशिपमध्ये बिझनेस करतात त्यांनी पैशांच्या व्यवहारात जास्त सावध राहायला हवं आणि महत्त्वाची कागदपत्रं नीट तपासून घ्यायला हवीत. तब्येतीच्या बाबतीत काहींना डोकेदुखी किंवा पोटाचा त्रास जाणवू शकतो. रोजची शिस्तबद्ध दिनचर्या, योगा आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता टिकवायला मदत होऊ शकते. यावर उपाय म्हणून रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो.
तूळ राशीसाठी सूर्य बाराव्या घरात जाणार आहे तर शनी सहाव्या घरात असेल. ज्योतिषशास्त्रानुसार खूप मेहनत करूनही अपेक्षित रिझल्ट यायला उशीर होऊ शकतो. अशा वेळी घाई न करता संयम ठेवणं फायद्याचं ठरेल. तब्येतीच्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये असंही सांगितलं जातंय. सोशल लाईफमध्ये आणि ऑफिसमधल्या बोलण्यातही संयम ठेवणं गरजेचं आहे, कारण विचार न करता बोलल्यानं वाद किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहू शकतो. यावर उपाय म्हणून भगवान शंकराची पूजा करून नियमित शिवमंत्राचा जप करण्याचा सल्ला आहे.
मीन राशीत शनी आधीपासूनच बसलेला आहे आणि सूर्य कन्या राशीत गेल्यावर तो मीन राशीच्या सातव्या घरात येईल. या ग्रहस्थितीमुळे वैवाहिक आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी बोलताना संयम ठेवावा आणि उगाच वाद ओढवून घेऊ नयेत असं सांगितलं जातंय. मोठे आर्थिक निर्णय घेण्याआधी नीट विचार करायला हवा. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी कामगिरीवर लक्ष ठेवून असू शकतात, त्यामुळे जबाबदाऱ्या गांभीर्यानं घ्याव्यात. काहींना ताण किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. यावर उपाय म्हणून रोज मनापासून गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो.