सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:46 IST

रायगडमध्ये उन्हाच्या झळांनी सुपारीची कच्ची फळे गळाली, बागायतदारांकडून पंचनाम्यांची मागणी

मे आणि जूनमधील तीव्र उष्णता व पाण्याच्या कमतरतेमुळे रायगड जिल्ह्यातील सुपारीच्या बागांना फटका बसला आहे.

रायगडमध्ये उन्हाच्या झळांनी सुपारीची कच्ची फळे गळाली, बागायतदारांकडून पंचनाम्यांची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रायगड जिल्ह्यात यंदा मे आणि जून महिन्यांत उन्हाचा कडाका जाणवला. त्याचा मोठा फटका सुपारीच्या बागांना बसला आहे. तापमान चाळीस अंशांच्या आसपास पोहोचले आणि पाण्याचीही कमतरता निर्माण झाली. त्यामुळे सुपारीच्या झाडांवरील कच्ची फळे मोठ्या प्रमाणावर गळून पडली आहेत.

काही भागांत ५० ते ७० टक्क्यांपर्यंत फळगळ झाल्याचा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. त्यातच ऑक्टोबर हीटमुळे उत्पादनाबाबतची चिंता वाढली आहे. पुढे अल निनोचा संभाव्य परिणाम झाला, तर त्याचाही सुपारी उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

अलिबागसह रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर सुपारी हे बागायतदारांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. वर्षभर बागेची निगा राखणे, खते देणे, औषध फवारणी करणे आणि पाणीपुरवठा करणे यासाठी बागायतदार मोठा खर्च करतात. यंदाच्या तीव्र उन्हामुळे मात्र सुपारीचे घोस करपले आणि कच्ची फळे गळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न घटण्याची शक्यता आहे आणि फळबाग मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

अलिबाग तालुका नारळ सुपारी प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आर्थिक भरपाई द्यावी, असे संस्थेचे म्हणणे आहे. कृषी विभागाने बाधित क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानीची नोंद घ्यावी आणि पात्र बागायतदारांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशीही मागणी होत आहे.

बदलते हवामान, चक्रीवादळे, वाढते तापमान आणि पाण्याची अनिश्चित उपलब्धता यामुळे या बागा टिकवणे आणि त्यातून अपेक्षित उत्पादन घेणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

सुपारी संस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक म्हणाले, "वर्षभर मेहनत करून सुपारीचे पीक हातातोंडाशी आले असताना तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी."

रायगडमधील सुपारी उत्पादकांना गेल्या काही वर्षांत निसर्ग चक्रीवादळाचा आणि त्यानंतर तौवते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. विशेषतः श्रीवर्धन, मुरूड आणि अलिबाग तालुक्यांतील अनेक सुपारी बागांचे नुकसान झाले. वादळाच्या तडाख्यात सुपारीची हजारो झाडे उन्मळून पडली, तर काही बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे सुपारी उत्पादनावर दीर्घकालीन परिणाम झाला आहे. त्या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता तीव्र उष्णता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे बागायतदारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ