शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:52 IST

बंगळुरूचे बस कंडक्टर ते सुपरस्टार: दहावीत नापास झालेले रजनीकांत किती शिकले?

'जेलर २' आज प्रदर्शित झाल्यानंतर रजनीकांत यांच्या शिक्षणाची आणि संघर्षाची कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे.

बंगळुरूचे बस कंडक्टर ते सुपरस्टार: दहावीत नापास झालेले रजनीकांत किती शिकले? छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दक्षिण भारतात 'थलैवा' आणि गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'जेलर २' आज, १५ ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'टाइगर मुथुवेल पांडियन'च्या भूमिकेत रजनीकांत यांनी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची ६० कोटींहून अधिकची ॲडव्हान्स बुकिंग झाली होती.

या यशाच्या निमित्ताने रजनीकांत यांच्या शिक्षणाची आणि संघर्षाची कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे. आज कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत शाळेत असताना इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे पहिल्या बाकावरून थेट मागच्या बाकावर गेले होते, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरू येथे एका सामान्य कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण त्यांनी गवीपुरम येथील गव्हर्नमेंट कन्नड मॉडेल प्रायमरी स्कूलमध्ये घेतले. तिथल्या परीक्षेत त्यांना ९८ टक्के गुण मिळाले आणि ते शाळेचे टॉपर ठरले.

पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना 'आचार्य पाठशाळा हायस्कूल' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. माध्यम बदलले आणि इंग्रजीची अडचण आली, त्यामुळे अभ्यासात त्यांना मोठा फटका बसला. एका व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः सांगितले होते, "प्राथमिक शाळेतील टॉपर असणारा मी, इंग्रजी माध्यमात आल्यावर थेट मागच्या बाकावर फेकला गेलो."

शाळेत असताना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (गणित) या विषयांची त्यांना प्रचंड भीती वाटायची. आठवी आणि नववीत शिक्षकांच्या मदतीने ते कसेबसे पास झाले, पण दहावीच्या परीक्षेत नापास झाले. त्यावेळी एपीएस हायस्कूलच्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी जादा क्लासेस घेतले, त्यांना पुन्हा शिकवले आणि पास होण्यास मदत केली.

याच शाळेतील भव्य मैदान आणि आंतरशालेय नाट्य स्पर्धांमधून त्यांच्यातील कलाकार घडला. एपीएस हायस्कूलमध्ये नाटकातील कामगिरीसाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पहिला पुरस्कार मिळाला होता.

शाळा संपल्यानंतर त्यांनी वेद, इतिहास आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. घरची परिस्थिती असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी कुली (Coolie) म्हणून काम केले, तसेच बंगळुरू वाहतूक विभागात बस कंडक्टर म्हणूनही काम केले.

पुढे त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आज त्यांच्या यशाची आणि जिद्दीची ही कहाणी भारतातील CBSE च्या शालेय अभ्यासक्रमात 'From Bus Conductor to Superstar' या धड्याच्या रूपाने विद्यार्थ्यांना शिकवली जाते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ